ट्रम्प यांनी झिडकारले पण झेलेन्स्कींना युरोपने दिला पाठिंबा; युक्रेनला 5000 क्षेपणास्त्र मिळणार
Ukraine UK Missile Deal, Keir Starmer-Volodymyr Zelenskyy : अमेरिकेमध्ये झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादानंतर अमेरिकेने युक्रेनला कोणतीहा मदत करण्याचे संकेत दिले. असे असताना त्याच्या दुसऱ्यादिवशी मात्र युरोपमधील अन् देशातील युक्रेनला मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तर युके- युक्रेन क्षेपणास्त्र करार देखील पूर्ण झाला आहे.
ब्रिटीश पीएम स्टारमर काय म्हणाले?
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर युक्रेनला 14 हजार कोटी रुपयांची मदत देणार आहेत, ज्यातून युक्रेन 5000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करू शकणार आहेत. स्टारमर म्हणाले की, ही क्षेपणास्त्रे ब्रिटनमधील बेलफास्टमध्ये तयार केली जातील, ज्यामुळे आपल्या संरक्षण क्षेत्रात नोकऱ्या वाढतील. एक दिवस आधी त्यांनी झेलेन्स्कींना 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याबद्दल बोलले होते.

अमेरिका आमचा विश्वासू भागीदार, तो कायम राहिल
स्टारमर म्हणाले की, अमेरिका अनेक दशकांपासून आमचा विश्वासू भागीदार आहे आणि भविष्यातही तो तसाच राहील. युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर युरोपीय देशांच्या संरक्षण शिखर परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी हे सांगितले. या बैठकीला 15 देशांचे राष्ट्रप्रमुख, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री, नाटोचे सरचिटणीस, युरोपियन युनियनचे अध्यक्ष आणि युरोपियन कौन्सिल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उर्वरित युरोपने दिला युक्रेनला पाठिंबा
एकीकडे अमेरिकेने नाकारल्यानंतर, युक्रेनला उर्वरित युरोपने पाठिंबा दिला आहे. रविवारी लंडनमध्ये युरोपीय देशांचे नेते भेटले. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, युरोपला स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः उभे राहावे लागेल. अमेरिकेला अविश्वसनीय मित्र मानणे चुकीचे ठरेल, परंतु युरोपला युक्रेनला मदत करत राहावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'व्हाईट हाऊसमध्ये जे घडले ते पुन्हा घडावे असे कोणालाही वाटत नाही," असे स्टारमर यांनी लंडनमधील सुरक्षा शिखर परिषदेनंतर सांगितले.
'युक्रेनसाठी शांतता योजना बनवणे'
स्टारमर म्हणाले, "आम्ही युक्रेनसाठी शांतता योजनेवर काम करत आहोत. ही योजना युरोपियन देशांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे आणि ती अमेरिकेसोबतही शेअर करण्यात येईल.
ट्रम्प-झेलेन्स्की वादावर युरोपचा प्रतिसाद
शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या वादविवादानंतर अमेरिकन मदतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला "कृतघ्न" म्हटले आणि अमेरिका आता युक्रेनला मदत मर्यादित करू शकते असे संकेत दिले. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी मीडियासमोर झेलेन्स्कीला फटकारले. दोघांमध्ये खूप जोरदार वादविवाद झाला जो जगभरात चर्चेचा विषय बनला. पण दरम्यान, युरोपने युक्रेनप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इतर देशांनी स्पष्ट केले की अमेरिकेची भूमिका काहीही असो, ते युक्रेनला पाठिंबा देणार आहेत आणि कायम देत राहणार आहे.












Click it and Unblock the Notifications