Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

US निवडणुकीत कमला विरुद्ध तुलशी, ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या नेत्याला लढाईत का उतरवले?

US Elections 2024 : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत आता महत्वाच्या महिन्यांकडे वाटचाल करत असून 10 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात पहिली वादविवाद चर्चा होणार आहे आणि या चर्चेसाठी दोन्ही नेत्यांनी तयारी सुरू केली आहे.

जूनमध्ये झालेल्या CNN च्या वादविवाद चर्चेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा दणदणीत पराभव झाल्यानंतर, पुढील वादविवाद डेमोक्रॅटिक पक्षासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण 27 जूनच्या चर्चेने बायडन यांना निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर काढले होते, त्यामुळे कमला हॅरिस यांच्यासाठी धोका अधिक आहे.

US Elections 2024

पण डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिसच यांची झपाट्याने वाढणारी लोकप्रियता ते थांबवू शकतात की नाही हे 10 सप्टेंबरच्या चर्चेनंतरच कळेल. गेल्या काही सर्वेक्षणांमध्ये, असे दिसून आले आहे की कमला हॅरिस या स्विंग राज्यांमध्ये आघाडीवर आहेत, त्यामुळे जर डोनाल्ड ट्रम्प 10 सप्टेंबरला चुकले तर त्यांच्या कॅम्पेन खराब होऊ शकते.

ट्रम्प यांनी मागितली तुलशी गबार्ड यांच्याकडे मदत

डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार टीमशी परिचित असलेल्या दोन लोकांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, माजी अध्यक्षांनी अलीकडेच त्यांच्या मार-ए-लागो इस्टेटमध्ये पूर्व-चर्चा एक्सरसाईज सत्रादरम्यान कमला हॅरिसवर हल्लाबोल आणखी जोरदार करण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या माजी नेत्या तुलसी गबार्ड यांना सामिल केला.

ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात काही अडथळ्यांचा सामना करावा लागल्याने तुलसी गबार्डचा संघात समावेश करावा लागला. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिक टिप्पणी करण्याऐवजी इमिग्रेशन आणि महागाई यांसारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर कमला हॅरिस यांचे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ट्रम्प प्रचार टीम चे मॅनेजरचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, कमला हॅरिस यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमधील ऐतिहासिक ब्लॅक काॅलेज, हॉवर्ड विद्यापीठात तिचे पहिले औपचारिक वादविवाद प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते, जिथे त्यांनी सुमारे चार दशकांपूर्वी एका वादविवादात भाग घेतला होता आणि त्या ट्रम्प यांच्या विरोधात वादविवाद एक अनुभवी स्टॅंड-इन सोबत मिळून काम करत आहेत. अनेक दिवसांपर्यंत तारखा मागे-पुढे झाल्यानंतर, अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांनी अखेरीस 10 सप्टेंबर रोजी एबीसी न्यूजवर वादविवाद करण्याचे मान्य केले आहे.

तुलशी ट्रम्प यांचा वादविवादावर कसा प्रभाव पाडणार?

2020 च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे राहिल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्ष सोडलेल्या तुलसी गबार्ड यांनी ट्रम्प समर्थकांमध्ये स्वत: चा एक सेलिब्रिटी म्हणून दर्जा मिळवला आहे. त्यांची ट्रम्प यांच्याशी दीर्घकाळ मैत्री होती आणि काही काळ तुलसी गबार्ड यांना ट्रम्पची रनिंग मेट मानले जात होते.

खंर तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलावले आहे कारण 2019 मध्ये तुलसी गबार्ड आणि कमला हॅरिस या दोघी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत होत्या आणि यावेळी झालेल्या डेमोक्रॅटिक प्राथमिक वादविवादात तुलसी गबार्ड यांनी कमला हॅरिस यांचा अनेक मुद्द्यांवर पराभव केला. तो वादविवाद आजही अमेरिकेत संस्मरणीय मानला जातो.

ट्रम्प यांच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, माजी राष्ट्राध्यक्ष "राजकीय इतिहासातील सर्वोत्तम वादविवादकर्त्यांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे, कारण जो बायडन यांना त्याचा धक्का बसला आहे. त्यांना पारंपारिक वादविवाद तयारीची गरज नाही", परंतु ते तुलशी गबार्ड यांच्या सारख्या आदरणीय धोरण सल्लागार आणि प्रभावी संभाषणकर्त्यांना भेटणे सुरुच ठेवतील, ज्यांनी 2020 मध्ये चर्चेच्या मंचावर कमला हॅरिस यांच्यावर यशस्वीरित्या मात केली होती."

बिडेनच्या एक्झिटने आणि कमला हॅरिसच्या एन्ट्रीने डेमोक्रॅट्समध्ये उत्साह संचारला आणि 59 वर्षीय कमला हॅरिसमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या वांशिक ओळख आणि धोरणांबद्दलच्या वैयक्तिक टिप्पण्यांमुळे काही प्रमाणात लोक संतप्त झाले आहेत, त्यामुळे तुलसी गबार्ड ट्रम्प यांना खूप मदत करू शकतात.

2020 मध्ये तुलसी गबार्ड विरुद्ध कमला हॅरिस

तुलसी गबार्ड आणि कमला हॅरिस या दोघांनी 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रचार केला, परंतु तिकीट मिळवण्यात त्यांना अपयश आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादात तुलसी गबार्डचा सहभाग रिपब्लिकन पक्षासाठी फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा आहे, कारण तुलसी खासदारही राहिल्या आहेत आणि गेल्या चर्चेदरम्यान, तुलसी गबार्ड यांनी कमला हॅरिस यांना अभियोक्ता म्हणून केलेल्या कामाबद्दल जोरदार फटकारले होते.

याशिवाय तुलसी गबार्ड यांनी कमला हॅरिस यांच्यावर फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीबाबत पुरावे लपवल्याचा आरोप केला होता आणि त्या पुराव्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले असते, असे म्हटले होते, परंतु कमला यांनी ते पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत . न्यायालयाने कमला हॅरिस यांना पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना हे पुरावे सादर करण्यास भाग पाडले.

वादविवादानंतर, कमला हॅरिसच्या टीमने कबूल केले होते की तुलशी यांच्या टिप्पण्यांमुळे कमला हॅरिसचा प्रचार अशा चक्रव्यूहात अडकल्या की तिची निवडणूक मोहीम यशस्वी झाली नाही.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+