Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Tsunami : रशियात भूकंपानंतर त्सुनामीचा तांडव; विनाशाचे महाभयानक Video व्हायरल!

Tsunami Video Viral : रशियाच्या पूर्वेकडील कामचटका भागात आज बुधवारी सकाळी आलेल्या 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने केवळ रशियालाच नव्हे, तर संपूर्ण पॅसिफिक महासागर क्षेत्राला हादरवून सोडले.

या शक्तिशाली भूकंपाने त्सुनामीचा धोका निर्माण केला असून, जपान, अमेरिका, चिली ते ग्वामपर्यंतच्या देशांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे किनारी भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले, अनेक ठिकाणी विध्वंसक लाटांनी कहर केला आहे. या घटनेचे व्हिडिओ सद्या सोशल मीेडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमधील दृश्य अतिशय महाभयंकर असून ते थरकाप उडवणारे आहेत.

tsunami earthquake

कसा आला हा विनाशकारी भूकंप?

हा भूकंप समुद्राखाली फक्त १९.३ किलोमीटर खोलीवर झाल्याने त्याची ऊर्जा थेट पृष्ठभागावर जाणवली. भूकंपाचे केंद्र रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्कीपासून १३३ किलोमीटर आग्नेयेस होते.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे डिपार्टमेंट (USGS) ने याला 'मेगाथ्रस्ट भूकंप' म्हणून वर्गीकृत केले आहे. टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे असे भूकंप येतात आणि ते मोठ्या प्रमाणात विनाश घडवू शकतात. त्यामुळे, या भूकंपाची तीव्रता आणि स्थान यामुळे त्सुनामीची शक्यता वाढली होती.

त्सुनामी कशी आली, कोणाला बसला फटका?

भूकंपानंतर काही मिनिटांतच पॅसिफिक महासागरात भूभागाच्या हालचालींमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर तीव्र लाटा उसळू लागल्या, ज्यामुळे त्सुनामीची निर्मिती झाली. यूएस त्सुनामी वॉर्निंग सेंटरनुसार, हवाई आणि रशियाच्या बेटांवर ३ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.

जपान (Japan), ग्वाम (Guam), चिली (Chile), सोलोमन बेटे (Solomon Islands), तैवान (Taiwan) यांसारख्या देशांमध्ये १-३ मीटर उंचीच्या लाटांचा धोका आहे.

फिलीपिन्स (Philippines), फिजी (Fiji), न्यूझीलंड (New Zealand), सामोआ (Samoa), पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) सह ५० हून अधिक भागांमध्ये ०.३-१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जपानमध्ये अलर्ट : फुकुशिमा प्लांट रिकामा!

या घटनेमुळे जपानमध्ये विशेषतः भीतीचे वातावरण आहे. जपान हवामानशास्त्र संस्थेने होक्काइडो (Hokkaido) आणि होन्शु (Honshu) साठी थेट त्सुनामी इशारा, तर शिकोकू (Shikoku) आणि क्युशू (Kyushu) साठी सल्लागार (advisory) जारी केला आहे.

विशेषतः, फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प (Fukushima Nuclear Power Plant) तातडीने रिकामा करण्यात आला. २०११ च्या विनाशकारी त्सुनामीमध्ये या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे यंदा कोणतीही जोखीम न घेता तातडीने उपाययोजना करण्यात आली.

भूकंपाचे भयानक व्हिडिओ: विनाशाचे तांडव

या घटनेनंतर भूकंपाचे आणि त्सुनामीच्या लाटांचे अनेक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये उंच इमारती डोलताना, लोक घाबरून रस्त्यावर धावताना, अनेक दुकाने आणि घरांच्या भिंतींना भेगा पडल्याचे दिसत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पाण्याच्या अजस्त्र लाटा वेगाने वाहत येतानाचे दृष्य अंगावर शहारे आणणारे आहे. हे व्हिडिओ निसर्गाचा प्रकोप किती भयानक आणि अनपेक्षित असू शकतो, याची भीषण जाणीव करून देतात. या घटनेमुळे पॅसिफिक किनारपट्टीवरील देशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+