Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कंडोमच्या पाकिटवर ट्रम्प यांचे कार्टून! विचित्र फोटोमुळे अमेरिकेत खळबळ, राजकीय वातावरण तापले

Trump Condom Photo Goes Viral : अमेरिकेच्या राजकारणात सध्या जेफ्री एप्सटीन प्रकरणाचे वादळ पुन्हा एकदा उसळले आहे. हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी एप्सटीनच्या मालमत्तेतून मिळालेले 19 फोटो सार्वजनिक केले आहेत. या फोटोंमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक फोटो असल्यामुळे व्हाईट हाऊसवर राजकीय दबाव वाढला आहे. मात्र, या 19 फोटोंमध्ये एका 'विचित्र' फोटोमुळे अमेरिकेत मोठा गदारोळ माजला आहे. एका पाकिटवर 'ट्रम्प कंडोम $4.50' असे लिहिलेले आहे आणि लाल रंगाच्या पॅकेजिंगवर ट्रम्प यांचे कार्टून असलेले कंडोमचे पाकीट ठेवलेले आहे!

Trump Condom Photo Goes Viral

एप्सटीनच्या मालमत्तेतील नवे 'ट्रम्प कनेक्शन'

हाऊस ओव्हरसाईट कमिटीचे ज्येष्ठ डेमोक्रॅटिक सदस्य रॉबर्ट गार्सिया यांनी ही छायाचित्रे सार्वजनिक केली. जारी केलेल्या १९ फोटोंपैकी तीन फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प स्पष्टपणे दिसत आहेत. एका फोटोत ट्रम्प अनेक महिलांसोबत उभे आहेत, या महिलांचे चेहरे झाकलेले आहेत.

डेमोक्रॅट्सची भूमिका काय?

गार्सिया यांनी स्पष्ट केले की, या फोटोंमध्ये कोणताही लैंगिक गुन्हा किंवा अल्पवयीन मुलांशी संबंधित दृश्य नाही. मात्र, या फोटोंमुळे एप्सटीनच्या संपर्कात असलेल्या प्रभावी लोकांचे अस्तित्व सिद्ध होते.

ट्रम्प यांनी दिले स्पष्टीकरण

या फोटोंवर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली की, "त्या माणसाला (एप्सटीनला) सगळे ओळखत होते. त्याच्याकडे सगळ्यांसोबतचे फोटो आहेत. यात काही मोठी गोष्ट नाही."

कंडोम'च्या फोटोने वाढवला वाद

या 19 फोटोंमध्ये 'ट्रम्प कंडोम'चा फोटो सर्वात जास्त चर्चेत आणि वादात आला आहे. या फोटोमध्ये एका भांड्यात कंडोमचे पाकीट ठेवलेले दिसत आहे, ज्यावर 'ट्रम्प कंडोम $4.50' असे लिहिलेले आहे आणि पाकिटावर लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे कार्टून रेखाटलेले आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि राष्ट्राध्यक्षांच्या विरोधकांना (विशेषतः डेमोक्रॅट्सना) टीकेसाठी नवा आणि धारदार मुद्दा मिळाला आहे.

राजकीय दबाव आणि ट्रम्प यांची बाजू

जेफ्री एप्सटीन प्रकरणातील ट्रम्प यांच्या उपस्थितीमुळे वॉशिंग्टनमधील राजकीय वातावरण तापले आहे. व्हाईट हाऊसने या फोटोंना 'राजकीय नाटक' असे संबोधले आहे आणि यातून काहीही सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे, ट्रम्प यांनी यापूर्वीही सांगितले आहे की ते एप्सटीनला सामाजिक स्तरावर ओळखत होते, पण 2004 मध्ये एप्सटीनला अटक होण्यापूर्वीच दोघांचे संबंध तुटले होते. ट्रम्प सातत्याने कोणत्याही चुकीच्या भूमिकेचा इन्कार करत आहेत.

आता पुढे काय?

या प्रकरणाची जनतेला संपूर्ण सत्य मिळणे आवश्यक आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करत राहू असे समाितीने म्हटले आहे. भविष्यात आणखी दस्तावेज किंवा छायाचित्रे सार्वजनिक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+