कुठल्याही क्षणी उडेल युद्धाचा भडका; पाकिस्तान-अफगाणिस्तानचे सैनिक आले सीमेवर समोरासमोर
पाकिस्तान- अफगाणिस्तानमधील वाद गेल्या काही वर्षांपासून वाढत चालला आहे. या वादने आता उग्र रूप धारण केले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हा तणाव वाढला होता. अशातच तालिबानचे 15 हजार सैनिक पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य तैनात केल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

युद्धाची शक्यता वाढली
पाकिस्तानी लष्कराच्या काही तुकड्या अफगाणिस्तानच्या सीमेवर पोहोचल्या आहेत. मीर अली सीमेजवळ तालिबानी सैनिकही सीमेवर पोहोचले आहेत. सध्या फायरिंग होत नसली तरी, दोन्ही बाजू्च्या सैनिकांची संख्या वाढली आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रभारींना समन्स बजावले आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाफिज झिया अहमद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
एअर स्ट्राईकने वाद वाढला
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात 30 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताने एअरस्ट्राईक केला होता. त्यामुळे हा वाद आणखीन वाढला. तालिबानकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे AK-47, मोर्टार, रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा साठा आहे. याशिवाय तालिबानी सैनिक डोंगर-दऱ्यांमधूनही हल्ले करतात, ज्याची पाकिस्तानी लष्करालाही कोणतीही माहिती नाही.
पाकिस्तान आर्थिक संकटात
दुसरीकडे हे युद्ध पाकिस्तानला न परवडणारे आहे. पाकिस्तानचे शेहबाज शरीफ सरकार आर्थिक संकट आहे. CPEC प्रकल्पाला होणारा विलंब आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावाद यांसारख्या समस्यांशी ते झुंजत आहे. या मुद्द्यांमुळे सरकार आणि लष्कर दोन्हीही कमजोर झाले आहेत. आता तालिबानसोबतच्या संघर्षामुळे हे संकट आणखी वाढणार असल्याची चिन्हेही निर्माण झाली आहेत.
तालिबान घाबरत नाही
तालिबान कोणत्याही लष्करी सैन्याला घाबरत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. यापूर्वी तालिबानी सैनिकांनी अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांना वर्षानुवर्षे आव्हान दिले. अखेर या दोन्ही सैन्यांना अफगाणिस्तानातून परत जावे लागल्याचा इतिहास आहे. तालिबानला तोंड देण्याची लष्करी ताकद किंवा आर्थिक क्षमता पाकिस्तानकडे नसल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.












Click it and Unblock the Notifications