Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रियकराशी लग्न न करू दिल्याने मुलीने घरातील 13 जणांचा जीव घेतला, वाचा- कसा रचला प्लॅन!

Pak girl poisons 13 family members : आवडत्या व्यक्तीसोबत लग्न न करू दिल्याने अनेक तरुण तरुणी स्वत:चा जीवनाचा शेवट करतात, अशा अनेक घटना समाजात आपणास पाहायला मिळतात. परंतु, पाकिस्तानमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबातील लोकांनी प्रियकरासोबत लग्न न करू दिल्याने संतप्त झालेल्या मुलीने प्लॅन करून कुटुंबातील सर्व सदस्यांना खाण्यामध्ये विष टाकून त्यांचा जीव घेतला. यात तेरा लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर मुलीस व तिच्या प्रियकरास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील सिंध प्रांतात रविवारी एका मुलीला तिच्या कुटुंबातील 13 सदस्यांचा त्यांच्या जेवणात विष घालून ठार मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तिला मनपसंदीचा वर निवडण्याची परवानगी न दिल्याने तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pak girl poisons 13 family members

कसा रचला तिने प्लॅन?

पाकिस्तानातील खैरपूरजवळील हैबत खान ब्रोही गावात 19 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी तपासाअंती सदर मुलीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर आरोपी मुलीला घरच्यांनी प्रियकराशी लग्न करण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे सदर मुलीला कुटुंबातील सर्वांचा राग आलेला होता. त्यानंतर सदर युवतीने प्रियकराच्या मदतीने षडयंत्र रचून आई-वडीलांसह कुटुंबातील सर्व म्हणजे 13 जणांच्या खाण्यात विष टाकले.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

जेवणानंतर कुटुंबातील सर्व 13 सदस्यांना उलट्या मळमळ व्हायला लागली. ते आजारी पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान, व काही उपचारापूर्वीच कुटुंबातील 13 सदस्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तेरा जणांचा मृत्यू झाल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली. घरातील एकच व्यक्ती जिवंत कशी राहिली, अशी शंका पोलिसांना आली.

पोलिसांनी खाक्या दाखवतात दिली कबुली

पोलिसांनी सर्वांचे शवविच्छेदन केले असता प्रत्येकाचा मृत्यू हा विषारी अन्न खाल्याने झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपासयंत्रणा फिरवली. सदर युवतीची चौकशी केली असता तिने आपण केलेल्या कृत्याची कबूली दिली. तर या कामात सदर युवतीचा प्रियकर देखील सामिल होता. पोलिसांनी अखेर दोघांनाही अटक केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+