Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोदी-मस्क भेटीतील 'ती' महिला कोण? मोदींनी पुस्तके भेट दिलेली 'ती' तीन मुले कोण? वाचा संपूर्ण प्रकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेक दिग्गज एलोन मस्क यांच्यात ब्लेअर हाऊस येथे काल बैठक झाली. या दोन दिग्गजांच्या भेटीची चर्चा केवळ अमेरिका- भारतातच नाही, तर जगभरात सुरु झाली आहे. मोदी मस्क यांच्या बैठकीच्या बातम्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोत तीन मुलांसह आलेली एक महिलाही दिसते. ती महिला कोण व ती मुले कोण, अशी चर्चाही सुरु झाली होती. या मुलांनी आणि या महिलेने पंतप्रधान मोदी तसेच संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

Musk-Modi visit

कोण होती ती महिला?

एलन मस्कने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड शिवोन झिलिसही आली होती. मस्क-मोदी भेटीत चर्चेत आलेली महिली शिवोन होती. शिवोन आपल्या तीन मुलांसह मोदीजींच्या भेटीला आली होती. मस्क व शिवोनने लग्न केले नसले तरी, त्यांना तीन मुले आहेत. ही तीन मुले घेऊनच मस्क आपल्या गर्लफ्रेंडसोबत मोदींच्या भेटीला आले होते. शिवोन गेल्या काही महिन्यांपासून मस्कपासून दूर होती. मात्र मोदींच्या भेटीदरम्यान ती अचानक मस्कसोबत दिसली.

शिवोन काय करते?

शिवोन झिलिसचा जन्म कॅनडात झाला आहे. तिची आई शारदा या भारतीय आहेत, तर वडील कॅनडीयन आहेत. एलोन मस्कच्या ब्रेन चिप स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकमध्ये शिवोन ही ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्सची संचालक म्हणून काम करते. त्यापूर्वी २०१७ ते २०१९ दरम्यान शिवोनने टेस्लाची प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे. सॅम ऑल्टमनच्या ओपन एआयमध्ये ती सल्लागार ही राहिली आहे. २०१५ मध्ये फोर्ब्सने ३० वर्षांखालील एक शक्तिशाली महिला म्हणून तिला सन्मानित केले होते. लिंक्ड इननेही त्यांच्या ३५ अंडर ३५ मध्ये शिवोनचा समावेश केला होता.

मुलांना मिळाले गिफ्ट

पंतप्रधान मोदींनी मस्क यांच्या तीन्ही मुलांना भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू देखील खूप लोकप्रिय आहेत. पंतप्रधान मोदींनी या मुलांना रवींद्रनाथ टागोरांचे 'द क्रेसेंट मून', आरके नारायण यांचे कलेक्शन आणि पंडित विष्णू शर्मा यांचे प्रसिद्ध ग्रंथ पंचतंत्र भेट म्हणून दिले. या गिफ्टची आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

काय झाली चर्चा?

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलोन मस्क यांनी अवकाश, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात एआय आणि अवकाश क्षेत्रात सहकार्य स्थापित करण्याबद्दल आणि मजबूत करण्याबद्दल देखील बोलले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+