पक्षाने धडक दिली म्हणून कझाकिस्तानचं विमान कोसळलं..? नाही, 'हे' मोठ्ठं कारण आलं समोर
कझाकिस्तानच्या विमानाला बुधवारी अपघात झाला. हे विमान कझाकिस्तानवरुन रशियाला निघालं होतं. अक्ताऊ शहराजवळ या विमानाला अपघात होऊन त्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या विमानाल पक्षांचा थवा धडकल्याने अपघात झाल्याचे सांगितले गेले. मात्र आता या अपघाताचं मोठ्ठ कारण समोर आलं आहे.

३८ जणांचा मृत्यू
कझाकिस्तानवरुन रशियाला जाणाऱ्या जे २-८२४३ या विमानाला बुधवारी अपघात झाला. त्यात ६७ प्रवाशी प्रवास करत होते. अक्ताऊ शहराजवळ नियोजित मार्गावरुन हे विमान भरकटले आणि शेकडो मैल दूर उडून कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर क्रॅश झाले. त्यात ३८ जाणांचा मृत्यू झाला होता. उर्वरीत प्रवाशांना वाचविण्यात यश आले होते.
Reports are coming in of an accident at Aktau Airport, Kazakhstan involving an Azerbaijan Airlines Embraer ERJ-190. pic.twitter.com/X42mS3sSsO
— Aviation Safety Network (ASN) (@AviationSafety) December 25, 2024
अपघाताचं कारण
सुरुवातीला या अपघाताची माहिती कझाकिस्तान परिवहन मंत्रालयाने दिली होती. त्यांच्या माहितीप्रमाणे या विमानात ६७ प्रवासी होते. त्यात ६२ प्रवाशी तर पाच क्रू सदस्य होते. हे विमान बाकू ग्रोझनी मार्गावरुन भरकटले आणि अक्तावू शहराजवळ क्रॅश झाले. त्यानंतर अनेक मीडियाने पक्षांचा थवा या विमानाला धडकल्याचे सांगितले होते.
खरे कारण समोर
कझाकिस्तान आऊटलेट मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी क्रॅश झालेले या विमानाच्या अपघाताचे खरे कारण हे ऑक्सिजन टँकचा स्फोट हे आहे. ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने या विमानाचा आपघात झाला. विमान अपघात होण्यापूर्वी या विमानातील अनेक प्रवाशी हे बेशुद्धही पडल्याचे या मीडियाने सांगितले आहे.












Click it and Unblock the Notifications