मोठी बातमी : इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला; वाहनचालकाने सात पादचाऱ्यांना उडवले, पोलिस म्हणतात...

उत्तर इस्रायलमध्ये आज एका बेधुंद वाहनचालकाने सात पादचाऱ्यांना उडवले. हे सर्व नागरिक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तत्काळ या वाहनचालकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तात हा अपघात नसून दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे.

Terrorist attack in Israel

उत्तर इस्त्रायलमध्ये हा हल्ला करण्यात आला. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, "पोलिस दलांनी या संशयास्पद वाहनाला पकडले असून संशयीत वाहनचालकालाही अटक कऱण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैफा शहराच्या दक्षिणेकडील कारकुर जंक्शनवर वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी एका निवेदनात व्यक्त केला.

इस्रायलचे मॅगेन डेव्हिड अ‍ॅडोम यांनी सांगितले की, त्यांची टीम घटनेच्या ठिकाणी सात जणांवर उपचार करत आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले. चॅनल १२ ने वृत्त दिले आहे की, संशयित दहशतवादी हा हैफा जवळील मार्ले आयर्न समुदायातील २४ वर्षीय अरब इस्रायली आहे. अरबचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी किंवा सुरक्षा रेकॉर्ड नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+