दोन चौक्यांवर ताबा, पाकिस्तानचे 19 सैनिक मारले; अफगानिस्तानने बदला घेतलाच....

पाकिस्तान-अफगानिस्तानमध्ये अखेर युद्ध सुरु झाले. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानवर धावा बोलला. शुक्रवारी रात्रभर अफगान सैन्याने पाकिस्तानच्या सैनिकांवर भीषण हल्ला सुरु ठेवला. रात्रभर तोफा, मशीनगन सुरु होत्या. अफगानिस्तानमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानचे १९ सैनिक मारत दोन चौक्यांवर ताबा मिळवला आहे.

Pakistan-Afghanistan war

दोन चौक्यांवर ताबा

तालिबानी संरक्षण मंत्रालयाने एका मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, डूरंग लाइनवरील खोस्त आणि पाकटिओ येथे तालिबानी सैन्याने हल्ला केला. पाकिस्तानच्या दोन चौक्यांवर ताबा मिळवला. या दोन्ही चौक्या जाळून टाकत त्या चौक्यातील मोठी शस्त्रास्त्रे जप्त केली. या चौक्यावर असलेले काही पाकिस्तानी सैनिक मारले गेले. काही सैनिक पळून जाण्यात यशस्वी झाले. तालिबान लष्काराने पाकिस्तानेच 19 सैनिक मारल्याचा दावा टोलो न्यूज या वाहिनीने केला आहे.

गोळीबार अजूनही सुरुच

अल मिरसादने या तालिबीनी मिडिया हाऊसने दिलेल्या बातमीत तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी ठिकाणांवर रात्रभर हल्ले केल्याचे सांगण्यात आले आहे. ड्युरंड लाइनवरील डबगई भागात हे हल्ले करण्यात आले. याशिवाय तालिबानी सैन्याने खोस्त प्रांतातूनही पाकिस्तानी लष्कराच्या ठाण्यांवर हल्ले केले. अनेक भागात दोन्ही सैन्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गोळीबार अजूनही सुरु असल्याचेही काही वृत्तवाहिन्यांचे म्हणणे आहे.

पाकचा वेगळाच दावा

पाकिस्तानी लष्कराकडून त्यांच्या सैन्याचे झालेले नुकसान लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. पाकिस्ताने आमचा केवळ एक जवान मारला गेल्याचे सांगितले आहे. पहाटे साडेचार वाजता हा हल्ला झाल्याचे पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात किमान तीन अफगाण ठार झाले असून, नऊ जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+