Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तैवानला भूकंपाचा जोरदार धक्का; 6.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेने हादरले शेजारील तीन देश!

Taiwan earthquake today : आग्नेय तैवानमध्ये बुधवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली आहे. विशेष म्हणजे, या भूकंपाचे धक्के केवळ तैवानपुरते मर्यादित न राहता शेजारील देश चीन, फिलीपिन्स आणि जपानपर्यंत जाणवले आहेत. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीचे वृत्त नाही.

Taiwan earthquake today

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता

केंद्रीय हवामान प्रशासन (CWA) ने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ५:४७ वाजता भूकंपाचे धक्के बसले. तैतुंग काउंटी हॉलच्या उत्तरेस १०.१ किलोमीटर अंतरावर. जमिनीखाली ११.९ किलोमीटरवर हे धक्के बसले.

तैवानमध्ये भूकंपाची तीव्रता १ ते ७ च्या प्रमाणात मोजली जाते. ताज्या आकडेवारीनुसार, तैतुंग काउंटीमध्ये ५ रिश्टर स्केल, तर हुआलियन आणि पिंगटुंग काउंटीमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे.

मोठे संकट टळले: उद्योगधंदे सुरक्षित

तैवानमधील 'नॅशनल फायर एजन्सी'ने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक पाहणीत कुठेही मोठे नुकसान झालेले नाही. तैवानमधील जगातील सर्वात मोठी चिपमेकर कंपनी TSMC ने देखील दिलासादायक बातमी दिली आहे. भूकंपाची तीव्रता इतकी भीषण नव्हती की कारखाने रिकामे करावे लागतील, त्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

तैवानमध्येच वारंवार भूकंप का होतात?

तैवान हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात वसलेले आहे. त्यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. तैवान हे युरेशियन प्लेट आणि फिलीपीन सी प्लेट या दोन प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सच्या संगमावर आहे.

दाब निर्मिती: या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, ज्यामुळे जमिनीखाली प्रचंड ऊर्जा आणि दाब निर्माण होतो. हा दाब अचानक बाहेर पडल्यास भूकंप होतो.

रिंग ऑफ फायर : तैवान हा पॅसिफिक महासागरातील 'रिंग ऑफ फायर'चा भाग आहे. जगातील सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी याच पट्ट्यात सक्रिय असतात.

भयावह भूतकाळ : गेल्या वर्षीचा ७.२ रिश्टर स्केलचा धक्का

आजचा भूकंप सौम्य असला तरी तैवानला बसलेले मागील धक्के अत्यंत विनाशकारी होते.

३ एप्रिल २०२४: हुआलियन प्रदेशात ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आणि १,१०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

१९९९ चा 'चि-ची' भूकंप : हा तैवानच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंप (७.७ तीव्रता) होता, ज्यात २,४०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.

२०१६ : दक्षिण तैवानमधील ६.४ तीव्रतेच्या भूकंपात १०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

जपानमध्येही ७.५ तीव्रतेचा धक्का

केवळ तैवानच नाही, तर संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात सध्या भूगर्भीय हालचाली वाढल्या आहेत. ८ डिसेंबर रोजी जपानमधील आओमोरी प्रांताला ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा धक्का बसला होता. यामुळे त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला होता. या भूकंपात ३० जण जखमी झाले असून रस्ते आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+