सीरियाचा हुकुमशहा बशर अल असदचे राष्ट्रपती पद जाताच पत्नीनेही सोडली त्याची साथ, घटस्फोट मागितला
Bashar al-Assad Divorce News : जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत पत्नी त्याच्यासोबत राहिली आणि सत्ता हिसकावून घेतल्यानंतर पत्नीने साथ सोडली. होय ही घटना घडली एका हुकुमशहा असलेल्या राजासोबत.
सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या क्रूर शासनाचे पतन झाले. त्यानंतर काही आठवड्याच त्यांच्या पत्नीने रशियामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आता त्यांची पत्नी युनायटेड किंगडममध्ये जाण्याचा प्लॅन आखत आहे. आपल्या पतीची साथ सोडून ती माहेरी जाण्याच्या तयारीत आहे.
द जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, नुकतेच पदच्युत झालेले सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या पत्नी अस्मा अल-असद यांनी मॉस्कोमधील आपल्या जीवनाविषयी असंतोष व्यक्त केला आहे. तर त्यांनी आता पतीपासून विभक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

सीरियाचे माजी राष्ट्रपती घटस्फोट घेणार
सीरियाची राजधानी दमास्कसवर बंडखोरांनी हल्ला करताच, हुकूमशहा अध्यक्ष बशर अल-असद यांनी देश सोडून रशियात आश्रय घेतला. असदचा दीर्घकाळचा मित्र असलेल्या रशियाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला "मानवतावादी आधारावर" आश्रय दिला आहे. अस्मा आता लंडनला जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त तुर्की आणि अरब मीडियाने दिले आहे.
वृत्तानुसार, सीरियाच्या नेत्याच्या पत्नीने मॉस्को सोडण्यासाठी विशेष परवानगीसाठी रशियाच्या न्यायालयात अर्ज केला आहे. त्याच्या अर्जाची रशियन अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अस्माकडे ब्रिटन आणि सीरियाचे दुहेरी नागरिकत्व आहे. तिचे पालक सीरियन-ब्रिटिश नागरिक होते आणि ती लंडनमध्ये जन्मली आणि वाढली.
असदच्या कुटुंबावर रशियामध्ये कठोर निर्बंध
अस्मा 2000 मध्ये सीरियाला गेली आणि त्याच वर्षी असदशी लग्न केले. त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षे होते. रशियन अधिकाऱ्यांनी असद यांची आश्रयाची विनंती मान्य केली असली तरी, सीरियाचा नेता अजूनही कठोर निर्बंधाखाली जगत आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, त्याला सध्या मॉस्को सोडण्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यात सहभागी होण्याची परवानगी नाही.
दरम्यान, रशियन अधिकाऱ्यांनी त्याची मालमत्ता आणि पैसाही जप्त केला आहे. तर, जेव्हा तो सीरियातून मॉस्कोला पळून गेला तेव्हा त्याने 270 किलो सोने आणि 2 अब्ज डॉलर्स घेतले. याशिवाय रशियाच्या राजधानीत त्याच्याकडे 18 अपार्टमेंट असलेली एक इमारत आहे. विशेष म्हणजे बशर अल-असद यांचे भाऊ महेर अल-असद यांची आश्रयाची विनंती रशियाने अद्याप स्वीकारलेली नाही.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याची आश्रय विनंती अजूनही "पुनरावलोकन" अंतर्गत आहे. हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) च्या नेतृत्वाखालील बंडखोर सैन्याने केलेल्या आक्रमणादरम्यान डिसेंबरच्या सुरुवातीला असदची दशके चाललेली राजवट कोसळली.
हयात तहरीर अल-शाम (HTS) ला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असले तरी, गेल्या आठवड्यात अमेरिकेने HTS नेता अबू मोहम्मद अल-जुलानीच्या डोक्यावर ठेवलेले $10 दशलक्ष इनाम काढून टाकले. या संघटनेशी बोलणी सुरू असल्याचे अमेरिकेने मान्य केले होते.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई








Click it and Unblock the Notifications