सुनीता विल्यम्सला डोनाल्ड ट्रम्प खिशातून देणार 'ओव्हरटाईम'; अंतराळवीरांना किती असतो पगार? वाचा
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना नऊ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर थांबावे लागले. तांत्रिक अडचणींमुळे आठ दिवसांची ही मोहिम तब्बल नऊ महिन्यांपेक्षा जास्त चालली. आता अंतराळवीरांना पगार किती असतो आणि नऊ महिने १४ दिवसांच्या प्रवासासाठी त्यांना ओव्हरटाईम दिला जाईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. याच प्रश्नाचे उत्तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले.

नासात किती मिळतो पगार?
नासाचे अंतराळवीर विल्मोर आणि विल्यम्स यांना सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मानधन वेतन दिले जाते. ते आठवड्यातून ४० तास काम करतात. त्यांना ओव्हरटाईम, वीकेंड किंवा सुट्टीसाठी अतिरिक्त वेतन मिळत नाही. गेल्या वर्षी, नासाच्या अंतराळवीरांनी १५२,००० डाॅलर पेक्षा जास्त कमाई केली होती.
मिळतो टीए आणि डीए
अंतराळवीरांना त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून प्रवास करून अधिकृत सरकारी कर्मचारी मानले जाते. या कारणास्तव नासा त्यांचे वाहतूक, निवास आणि जेवण यासारखे खर्च भागवते. याव्यतिरिक्त, त्यांना छोट्या दैनंदिन खर्चासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाते. सध्या, ही रक्कम प्रतिदिन ५ डाॅलर निश्चित केली आहे. विल्मोर आणि विल्यम्स यांनी अंतराळात २८६ दिवस घालवले, ज्यासाठी प्रत्येकी १,४३० डॉलर्स मिळाले.
ट्रम्प खिशातून देणार ओव्हरटाईम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अंतराळवीरांच्या ओव्हरटाईमबाबत विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, ते नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात अतिरिक्त वेळ घालवण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे देतील. अंतराळवीरांना घरी परत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम अंतराळयानाबद्दल ट्रम्प यांनी एलोन मस्क यांचे आभार मानले.
एलोन मस्क यांचे आभार
दोन्ही अंतराळवीरांच्या ओव्हरटाइमबद्दल विचारले असता, ट्रम्प म्हणाले, "जर मला करावे लागले तर मी माझ्या स्वतःच्या खिशातून पैसे देईन आणि मी एलोन मस्कचे आभार मानू इच्छितो, कारण जर तो नसता तर काय झाले असते याची कल्पना करा."












Click it and Unblock the Notifications