Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्राध्यक्षांना घरात घुसून पोलिसांनी केली अटक; एवढी मोठी कारवाई का झाली

South Korea President Arrested : दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. योल यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सीडीचा वापर करुन त्यांच्या घरात प्रवेश केला अन् त्यांना जेरबंद केले. मुळात यून सुक-योल यांनी देशात अचानक 3 डिसेंबर रोजी आणीबाणी लागू केली होती. त्याला विरोध झाल्यानंतर त्यांना पदावरुन खाली उतरावे लागले. तर याच घटनेची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

देशाच्या संसदेने केवळ 3 तासांनंतर मार्शल लॉ (आणीबाणी) चा निर्णय रद्द केला. यानंतर, 14 डिसेंबर रोजी संसदेत योल यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. महाभियोगाची सुनावणी 14 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार होती, त्यासाठी योलला न्यायालयात हजर राहावे लागले. योल काल न्यायालयात हजर झाले नाही.

South Korea President Arrested

यानंतर, आज बुधवारी सकाळी तपास यंत्रणांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना घटनास्थळी समर्थकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. तर काही वृत्तानुसार माजी राष्ट्राध्यक्षांच्या अटकेसाठी एक हजाराहून अधिक पोलिस तैनात करण्यात आलेले होते.

कशी केली नेमकी अटक, काय घडलं?

योलच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारले होते. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यासाठी योल समर्थक मोठ्या संख्येने आले. त्यानंतर पोलिसांनी शिडी वापरून योलच्या घरात प्रवेश केला. योल न्यायालयात हजर न राहिल्याने कालपासूनच त्याची अटक होणार होती. त्यामुळेच, रात्रीच त्याच्या घराबाहेर योल समर्थक जमू लागले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आणि योलच्या वकिलांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाकडून वॉरट मिळेल का?

योलच्या अटकेनंतर, तपास संस्थांना त्याची चौकशी करण्यासाठी 48 तासांचा वेळ आहे. यानंतर, त्याच्या अटकेसाठी न्यायालयाकडून औपचारिकपणे वॉरंट मिळवावे लागेल. योलचे सल्लागार, सेओक डोंग-ह्योन यांनी अटकेपूर्वी सांगितले होते की, जर त्याला अटक करण्यासाठी आलेले अधिकारी परत आले तर युन सुक योल चौकशी करण्यास तयार आहे. दुसरीकडे, योल यांच्याविरुद्धच्या महाभियोग आणि बंडखोरीशी संबंधित आरोपांची वैधता ऐकण्यासाठी न्यायालयाकडे 14 डिसेंबरपासून 180 दिवसांचा कालावधी आहे. जर सर्वोच्च न्यायालयाच्या 8 पैकी 6 न्यायाधीशांनी योलच्या विरोधात मतदान केले तर त्याला दोषी ठरवले जाईल. जर या काळात येओलला दोषी ठरवण्यात आले नाही किंवा महाभियोग अवैध घोषित करण्यात आला तर येओल पुन्हा एकदा दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.

योल यांना आणीबाणी का लागू केली?

दक्षिण कोरियाच्या संसदेत एकूण 300 जागा आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधी पक्ष डीपीकेला मोठा जनादेश दिला होता. सत्ताधारी पीपल पॉवरला फक्त 108 जागा मिळाल्या, तर विरोधी पक्ष डीपीकेला 170 जागा मिळाल्या. बहुमतामुळे, विरोधी पक्ष डीपीके राष्ट्रपती सरकारच्या कामकाजात खूप हस्तक्षेप करत होता आणि त्यांना त्यांच्या अजेंड्यानुसार काम करता येत नव्हते.

2022 च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष योल यांनी कमी फरकाने विजय मिळवला. यानंतर त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. त्यांची पत्नी अनेक वादांमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवरही परिणाम झाला. या सगळ्याला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतींनी मार्शल लॉ लागू केला. त्यांनी डीपीकेवर उत्तर कोरियाबद्दल सहानुभूती असल्याचा आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+