Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी: दक्षिण कोरियामध्ये मोठा अपघात,181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, 179 जणांचा मृत्यू

South Korea Plane crash: दक्षिण कोरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं आहे. या अपघातात आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून जाताना हा अपघात झाला.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून उतरले. हे विमान जेजू एअरवेजचे होते. विमानात 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट होते. हे विमान थायलंडहून परतत होते.

South Korea plane cras

फोटो सौजन्य- पीटीआय

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. हे विमान जेजू एअरवेजचे होते. विमानात 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट होते. हे विमान थायलंडहून परतत होते. रिपोर्टनुसार, दोन लोक वगळता सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

बँकॉकहून उड्डाण घेतलेले हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.07 वाजता नैऋत्य किनारी विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात धावपट्टीवरून घसरले आणि कुंपणाला आदळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये विमानाला आग लागल्याने धूर आणि ज्वाला विमानाच्या काही भागांमध्ये पसरत असल्याचे दिसून आले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+