Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Singapore Ganoshotsav 2024 : सिंगापुरातील महाराष्ट्र मंडळ गणरायांच्या आगमनासाठी सज्ज

Singapore Ganoshotsav 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच सिंगापूर देशाचा दौरा झाला. या दौऱ्यातून भारत आणि सिंगापूर यांचे संबंध अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे. अशातच दुसरीकडे भारतात गणेश उत्सवाला उद्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर सातासमुद्रापार गेलेल्या भारतीयांकडून देखील त्या त्या देशांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा केला जातो.

सिंगापूर येथील महाराष्‍ट्र मंडळाच्‍या वतीने दरवर्षी सिंगापूरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदा देखील मंडळाच्या वतीने 5 दिवसीय गणेशोत्‍सव साजरा केला जाणार आहे. पाच दिवसांच्या कार्यकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्‍सवात ऐतिहासिक साहित्‍यवाचन, कॉर्पोरेट कीर्तन, सभासदांच्‍या गायनाचा कार्यक्रम व विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

Ganesh Chaturthi 2024

पाच दिवस भव्यदिव्य सोहळा

सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सचिन गंजापूरकर यांनी वृत्तसंस्थेंशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, सिंगापूरमध्ये गणेशोत्सव 5 दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र मंडळ गेल्या 30 वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे. आतापर्यंत कायम चार भींतींच्या आतमध्येच उत्सव साजरा केला गेला. पण यावेळी आम्ही गणेशोत्सव जोरदार व भव्य दिव्य साजरा करू.

सिंगापूरच्या लिटिल इंडिया परिसरात खुल्या जागेवर भव्य मंडपात या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशमूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूमातीची असते. उद्या शनिवारी सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. भारतात हा सोहळा दहा दिवस असतो. परंतु , आम्ही येथे मंडळाच्या वतीने पाच दिवस उत्सव साजरा करून देवाची आराधना करतो. उद्याच्या कार्यक्रमासाठी 7000-10000 लोक गणेशोत्सवाला हजेरी लावतील. तर पाच दिवसांच्या काळात जवळपास पंचवीस हजारांपेक्षा अधिक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येथील असा विश्वास देखील सचिन गंजापुरकर यांनी व्यक्त केला.

पूर्वीपेक्षा आता मोठा सोहळा

सिंगापूरच्या लिटिल इंडिया भागातील दुकानमालक राजा कुमार चंद्रा म्हणाले की, 30-35 वर्षांपूर्वी, सिंगापूरमधील लोक गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी फारसे काही करत नव्हते ते फक्त घरीच प्रार्थना करायचे. पण आता नवीन लोकांसह 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतातून आलेले, जे सिंगापूरचे नवीन नागरिक बनले आहेत.

ते सर्व लोक आता गणेश चतुर्थी उत्सव अनेक अधिक चांगल्या पटीने साजरा करत आहेत. नवीन लोकांनी त्यांच्यासोबत खूप परंपरा आणि संस्कृती आणली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील सिंगापूर भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+