Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sheikh Hasina वैज्ञानिकाच्या प्रेमात पडल्या; लग्नाच्या वाढदिवशीच फाशीची शिक्षा, वाचा त्यांची कहाणी!

Sheikh Hasina Love Story and Life News : बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना वाजेद यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण आणि नाट्यमय पर्व सोमवारी, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी संपुष्टात आले.

एका वैज्ञानिकाच्या प्रेमात पडून त्यांच्याशी विवाह करणाऱ्या आणि देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणाऱ्या शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने (ICT) मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विशेष म्हणजे, ही फाशीची शिक्षा त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच सुनावण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील शोकांतिका अधिक गडद झाली आहे.

Sheikh Hasina Love Story Life

सत्तापालटानंतरची फाशीची शिक्षा

जवळपास १५ महिन्यांपूर्वी बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर शेख हसीना यांच्यावर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. जुलै क्रांतीदरम्यान (July Revolution) आंदोलकांवर प्राणघातक शक्ती वापरण्याचे आदेश देणे आणि प्रक्षोभक भाषणे करणे, असा आरोप लावण्यात आला.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने (ICT) त्यांना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. हसीना यांनी या निर्णयावर आक्षेप घेत, हे 'हेराफेरीद्वारे स्थापन केलेले पक्षपाती आणि अलोकतांत्रिक न्यायाधिकरण' असल्याचे म्हटले आहे. तसेच, 'अतिरेकी घटक बांगलादेशच्या निवडून आलेल्या पंतप्रधानांना संपवू इच्छित आहेत', अशी टीका त्यांनी केली आहे.

२० वर्षांहून अधिक काळ पंतप्रधानपद

शेख हसीना ह्या बांगलादेशचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. त्यांनी १९९६ ते २००१ आणि त्यानंतर २००९ ते २०२४ पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर काम केले. एकूण २० वर्षांहून अधिक काळ सेवा करत त्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान ठरल्या. त्या केवळ देशातच नव्हे, तर जगभरात एक प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.

वाजेद मियाँ यांच्याशी प्रेमविवाह!

शेख हसीना यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक सुंदर योगायोग म्हणजे त्यांचा बंगाली अणुशास्त्रज्ञ एम.ए. वाजेद मियाँ यांच्याशी झालेला विवाह. १९६७ मध्ये, हसीना ढाका कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष होत्या. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची डरहम येथे भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या वाजेद मियाँ यांच्याशी भेट झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दुर्दैवी योगायोग

हसीना यांचा वाजेद मियाँ यांच्याशी विवाह १७ नोव्हेंबर रोजी झाला होता. नियतीचा क्रूर खेळ असा की, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली तारीखही १७ नोव्हेंबर हीच ठरली.

कुटुंबता कोण कोण असते?

वाजेद मियाँ यांचे ९ मे २००९ रोजी निधन झाले. या दाम्पत्याला सजीब वाजेद (व्यावसायिक आणि आयटी तज्ञ) आणि सायमा वाजेद (मानसशास्त्रज्ञ आणि आरोग्य कर्मचारी) अशी दोन मुले आहेत.

दिल्लीतील 'कोठी क्रमांक ५६' शी खास संबंध

१९७५ मध्ये बांगलादेशातील सत्तापालटात हसीना यांचे पती, मुले आणि बहीण शेख रेहाना वगळता त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या झाली होती. या जीवघेण्या परिस्थितीत, भारताने हसीना आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय दिला. १९७५ ते १९७७ या काळात हसीना पती आणि बहिणीसोबत नवी दिल्लीतील लाजपत नगर-३ येथील घर क्रमांक ५६ मध्ये 'सौ. मजुमदार' या नावाने राहत होत्या.

सुरक्षित ठिकाण

तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकीय आश्रय दिला. हसीना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला कारण 'भारत आमच्यासाठी सुरक्षित होता' आणि येथून कुटुंबातील किती लोक मारले गेले आहेत, हे शोधणे सोपे होते. सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या याच हवेलीत 'हॉटेल डिप्लोमॅट रीजन्सी' सुरू असल्याची माहिती आहे.

मायदेशी वापसी

१६ फेब्रुवारी १९८१ रोजी बांगलादेश अवामी लीगच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, हसीना १७ मे १९८१ रोजी आपल्या मायदेशी परतल्या आणि त्यांनी बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा प्रवेश केला.

शेख हसीना यांच्या जीवनाची ही नाट्यमय कहाणी राजकारण, प्रेम आणि शोकांतिका यांचा एक विलक्षण मिश्रण आहे. फाशीची शिक्षा आणि त्यामागील नाट्यमय योगायोग, त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात, या सर्वांमुळे त्यांची कहाणी जागतिक राजकारणात कायम स्मरणात राहील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+