Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्याच्या राजवाड्यात 13 पत्नींसह राहत होते सौदी अरेबियाचे किंग फहद, जाणून घ्या त्यांच्या खास गोष्टी

Saudi King Fahd lived with 13 wives in the Golden Palace : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी ते सौदी अरेबियातील जेद्दाहला पोहचले आहेत. सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 22 ते 23 एप्रिल दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत.

सौदी अरेबिया हे एक श्रीमंत मुस्लिम राष्ट्र आहेच पण येथील राजांची अलिशान जीवनशैली तुम्हाला भुरळ पाडल्याशिवाय राहणार नाही. आज आपण सौदी अरेबियाचे किंग फहद यांच्या गोल्डन पॅलेस आणि इतर खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

Saudi King Fahd

गोल्डन पॅलेस अन् 13 पत्नी!

सौदी अरेबियाचे राजे फहद यांनी "गोल्डन पॅलेस" नावाचा एक राजवाडा बांधला होता, जिथे ते त्याच्या 13 पत्नींसोबत राहत होते. हा राजवाडा आता खंडहर झाला आहे, तो मोडकळीस आला आहे.

सौदी अरेबियाचे किंग आपल्या अलिशान शाही जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत, 1982 मध्ये त्यांनी एक शानदार महल बनवला होता, यामध्ये हाॅस्पिटल, हेलिपॅज आणि एक मस्जिद होती.

कुणी बांधला होता "सोन्याचा राजवाडा"

गोल्डन पॅलेस नावाने ओळखला जाणारा हा राजवाडा स्पेनमध्ये सौदी अरेबियाचा राजा फहद याने बनवला होता. हा राजवाडा अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या धर्तीवर बांधला गेला होता. राजा फहदला एक दोन नव्हे तब्बल 13 बायका होत्या आणि तो त्यांच्यासोबत या राजमहालात राहत होता. नवभारत टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले त्यानुसार, हा राजवाडा आता मोडकळीस आला आहे आणि त्याची जमीन एकेकाळी £300 दशलक्ष इतकी प्रचंड मोठी होती.

किंग फहद यांचे ऐश्वर्य अन् अलिशान जीवनशैली

किंग फहद हे परदेशात भव्य राहणीमान आणि आलिशान जीवनशैलीचा आनंद लुटण्यासाठी ओळखले जात होते. प्रिन्स अब्दुल अझीझ यूएस $100 दशलक्ष डॉलर्सच्या त्याच्या 147-मीटर (482 फूट) नौकावर त्यांनी फ्रेंच रिव्हिएरावरील बंदरांना भेट दिली. जहाजात दोन जलतरण तलाव, एक बॉलरूम, एक व्यायामशाळा, एक थिएटर, एक पोर्टेबल गार्डन, एक अतिदक्षता विभाग असलेले रुग्णालय आणि दोन ऑपरेटिंग रूम आणि चार अमेरिकन स्टिंगर क्षेपणास्त्रे होती.

किंग फहदकडे होते बोईंग 747 जेट

विकिपिडियानुसार, किंग फहदकडे 150 दशलक्ष डॉलर्सचे वैयक्तिक बोईंग 747 जेट देखील होते. फहद यांच्या लहान वयात त्यांना दारू पिणे आणि जुगार याची त्यांना सवय होती. कॅसिनोमध्ये फहाद यांचे लाखो डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती आहे आणि राजा फैसलने फहाद यांना जेव्हा चपराक मारली त्यानंतर फहाद यांनी अशा सवयी सोडल्याचे बोलले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+