तीन महिन्यांनंतर 'महाप्रलय', चंद्राचा ही विनाश होणार, जपानी बाबा वांगाची भयावह भविष्यवाणी
जपानीमधील प्रसिध्द भविष्यवाणी करणारी महिला रियो तात्सुकी (जपानी बाबा वांगा) यांनी नुकत्याच केलेल्या भविष्यवाण्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. बाबा वांगाने भविष्यवाणी केली आहे की, पुढील तीन महिन्यात महाप्रलयासारखा महासुनामी येण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच पुढील हजारो वर्षांत चंद्र पूर्णपणे नष्ट होईल आणि ही घटना इतकी विनाशकारी असेल की पृथ्वीवरील जीवनाचे संतुलन बिघडेल, असं म्हटलं आहे.
बाबा वांगाची चंद्राच्या विनाशाची भविष्यवाणी
बाबा वांगा ज्या त्यांना 'बाल्कनचे नास्त्रदमस' म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत ज्यांचे काही प्रमाणात सत्य सिद्ध झाले आहे. पुढील तीन महिन्यात महाप्रलयासारखा महासुनामी येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. ज्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ शकतात.

त्यांनी दुस-या भविष्यवाणीत म्हटंल आहे की, 3000 ते 5000 या काळात एक प्रचंड उल्कापिंड चंद्रावर आदळेल. या धडकीनंतर, चंद्र धुळीच्या ढगात विखुरला जाईल. जर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह नाहीसा झाला तर त्याचे परिणाम केवळ आकाशातच जाणवणार नाहीत तर प्रत्येक महासागरावर, प्रत्येक ऋतूवर आणि प्रत्येक सजीव प्राण्यांच्या दैनंदिन दिनचर्येवरही जाणवतील. बाबा वेंगाने अशी भविष्यवाणी केली होती की, चंद्राच्या या विनाशामुळे मानवतेसाठी संकटांचा काळ सुरू होईल, जो 5079 मध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पोहोचेल, असं म्हटलं आहे
जपानी बाबा वांगाची महासुनामीची भविष्यवाणी
रियो तात्सुकी, ज्यांना 'जपानी बाबा वांगा' म्हणून ओळखले जाते. बाबा वेंगा यांनी पुढील तीन महिन्यात एका महासुनामीची भविष्यवाणी केली आहे, जी 2011 च्या जपानमधील सुनामीपेक्षा तीन पट मोठी असेल. जपानी बाबा वांगा यांनी अलिकडेच भाकित केले आहे की, जपानच्या दक्षिणेकडील समुद्र 'उकळत' आहे. या भयावह प्रतिमेला पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक म्हणून पाहिले जात आहे, जो प्रचंड त्सुनामी निर्माण करण्यासाठी पुरेसा शक्तिशाली असू शकतो. जर हे खरे असेल तर ही आपत्ती प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या देशांमध्ये विनाश घडवू शकते. त्याच्या स्वप्नात त्सुनामीचा केंद्रबिंदू जपान, तैवान, इंडोनेशिया आणि उत्तर मारियाना बेटांसह हिऱ्याच्या आकाराच्या भागात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे त्याने ड्रॅगनसारख्या आकृत्या त्याच दिशेने जाताना देखील पाहिल्या. त्यांच्या या भविष्यवाणीत भारताचे नाव समाविष्ट नाही.
तात्सुकीची मागील भविष्यवाणी 1995 च्या कोबे भूकंप आणि 2011 च्या तोहोकू सुनामी ही सत्य ठरली होती. त्यामुळे लोक त्यांच्या या नवीन भविष्यवाणीवरही विश्वास ठेवला जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही सुनामी एका पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे उद्भवू शकते, ज्यामुळे पॅसिफिक रिंग ऑफ फायर क्षेत्रात मोठी हानी होईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शंका
शास्त्रज्ञांनी या भविष्यवाण्यांवर संशय व्यक्त केला आहे. चंद्राच्या विनाशाबाबत अंतराळ संशोधकांनी सांगितले की, उल्कापिंडांचा धक्का होणे शक्य आहे, परंतु त्याचा पृथ्वीवर थेट परिणाम होणे हे सध्या उपलब्ध डेटावरून सिद्ध होत नाही. दुसरीकडे, महासुनामीच्या भविष्यवाणीवर भूवैज्ञानिकांनी म्हटले की, पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये ज्वालामुखी आणि भूकंपाची शक्यता नेहमीच असते, परंतु ती अचूक तारखेला घडेल असे सांगणे अशास्त्रीय आहे. तरीही, या भविष्यवाण्या लोकांमध्ये भीती आणि जागरूकता निर्माण करत आहेत, ज्यामुळे काही देशांनी आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला आहे.
मागील भविष्यवाण्यांचा इतिहास
बाबा वेंगाने 9/11 हल्ले, कोविड-19 महामारी आणि राजकुमारी डायनाचे निधन यांसारख्या घटनांची भविष्यवाणी केली होती, ज्यांचे काही प्रमाणात सत्यत् सिद्ध झाले होते. तितक्याचप्रमाणे रियो तात्सुकीने 1995 च्या कोबे भूकंप आणि 2011 च्या तोहोकू सुनामीच्या भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नवीन भविष्यवाणी लोकांचा विश्वास वाढला आहे, परंतु तज्ज्ञांनी यांना केवळ संभाव्यता म्हणूनच पाहण्याचा सल्ला दिला आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications