Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Russia-Ukraine War:रशियाच्या 41 फायटर जेटला नष्ट करणारे FPV ड्रोन काय आहे?, युक्रेनने कसा केला वापर

Russia-Ukraine War, FPV drone : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. कधी बॉम्बहल्ला, कधी मिसाईन हल्ला तर कधी सैन्याचा शिरकाव करून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला केला जात आहे. दुसरीकडे, युक्रेन देखील रशियाच्या हल्लाला जुमानत नाही, त्यांनी देखील तोडीस तोड देऊन पलटवार करणे सुरूच ठेवले आहे. अशातच युक्रेनने अतिशय नव्या पद्धतीने रशियाच्या हवाई तळांवर निशाणा साधला. तर करोडो रुपयांचे बॉम्बर्स, हवाई जेट नष्ट केल्याचे सांगितले जात आहे.

१ जून रोजी 'ऑपरेशन स्पायडरवेब' राबविले गेले

युक्रेनने १ जून २०२५ रोजी 'ऑपरेशन स्पायडरवेब'द्वारे रशियन लष्करी विमानतळांवर हल्ला जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात ४० हून अधिक बॉम्बर्सना नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, युक्रेनने यासाठी कोणतेही मोठे यश किंवा जेट वापरले नाही. त्यासाठी अतिशय स्वस्त किमतीत मिळणारे FPV ड्रोनचा वापर केल्याचे समोर आले आहे. ज्याने,महागडी रशियन विमाने नष्ट केली. चला हे ऑपरेशन नेमकं काय होते, या साठी किती खर्च लागला आणि ईपीएफ ड्रोन कसे काम करते, याविषयी सर्व काही जाणून घेऊया.

Russia Ukraine War

FPV ड्रोन काय आहेत?

FPV ड्रोन किंवा फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन एक अनोखी युद्ध रणनीती देतात. ते फ्रंट-माउंटेड कॅमेऱ्यातून रिअल-टाइम व्हिडिओ देखील रेकॉर्ड करतात आणि पाठवतात. ऑपरेटर त्यांना चष्मा किंवा स्क्रीन वापरून नियंत्रित करतात, जे ड्रोनच्या आत असण्याच्या अनुभवासारखे आहे. अचूक नेव्हिगेशन आणि लक्ष्यीकरणात हे तंत्रज्ञान खूप प्रभावी असल्याचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

FPV ड्रोन कसे कार्य करते?

युक्रेनमध्ये, FPV ड्रोनचे कामिकाझे ड्रोनमध्ये रूपांतर करण्यात आले. जे तीन टप्प्यात काम करतात. प्रथम, ते टँक किंवा विमानासारखे लक्ष्य शोधण्यासाठी उडवले जातात. एकदा ओळख पटल्यानंतर, ते त्याच्याशी टक्कर देतात, ज्यामुळे स्फोट होतो. हे ड्रोन बहुतेकदा ग्रेनेड किंवा आयईडी सारख्या स्फोटकांनी भरलेले असतात.

एफपीव्ही ड्रोनची किंमत किती?

युक्रेनियन सैन्य हे ड्रोन देशांतर्गत कमी किमतीत बनवत आहे. प्रत्येक ड्रोनची किंमत भारतीय रुपयांमध्ये ५० हजार ते १ लाख रुपये असते. ते मोटर्स, कॅमेरे आणि बॅटरीसह थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात. अवघ्या पन्नास ते साठ हजार रुपयांचे शस्त्र एका क्षणात कोट्यवधी रुपयांचे शस्त्र कसे नष्ट करू शकते, असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. परंतु, या ड्रोनकडे आधुनिक युद्धात क्रांती म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.

FPV ड्रोनचे नेमका धोका काय आहे?

एफपीव्ही ड्रोन त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे मोठे धोके निर्माण करतात. आधुनिक युद्ध पारंपारिक टँक आणि क्षेपणास्त्रांच्या पलीकडे जात आहे. एफपीव्ही ड्रोनकडे लहान पण बुद्धिमान शस्त्रे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

रशियावरील हल्ला हे या बदलाचे उदाहरण आहे, कारण युक्रेनने स्वस्त ड्रोन हाय-टेक बॉम्बर्स कसे नष्ट करत आहेत, हे दाखवून दिले आहे. या पिढीच्या युद्धात मोठ्या शस्त्रांपेक्षा स्टिल्थ शस्त्रांचा वापर कसा अधिक प्रभावी असू शकतो, हे सिद्द केले आहे.

या रशियन हवाई तळांवर केला हल्ला!

१ जून रोजी झालेल्या हल्ल्यात शेकडो FPV ड्रोन रशियन हवाई तळांवर घुसले आणि तेथे उभ्या असलेल्या बॉम्बर्सना नष्ट केले. रशियाच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणाली असूनही, अशा हल्ल्यांना रोखणे आव्हानात्मक ठरले आहे.

लक्ष्यित हवाई तळांमध्ये एंगेल्स एअरबेस, शैकोव्हका, मोजदोक, इंगोशेतियाचा लष्करी प्रदेश आणि ओरेल एअरफील्ड यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या तळांमध्ये Tu-95 आणि Tu-22M3 सारखे बॉम्बर्स होते, ज्यांचा वापर रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी केला होता. परंतु, आता युक्रेनने त्यांच्या नवीन तंज्ञाचा वापर करून हल्ला केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+