Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कारच्या स्फोटात रशियाचे जनरल ठार; पुतीन यांच्या विश्वासूंची का होतेय हत्या?, जाणून घ्या सविस्तर

Russia car bomb blast senior general died in moscow : रशिया युक्रेनमध्ये गेल्या काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. ते युद्ध काही केल्या थांबत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन्ही देशांवर दबाव आणला जात आहे, तरी देखील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, शुक्रवारी रशियाचे राजधानी मॉस्कोमध्ये मोठी दुर्घटना घडली. यात पुतीन यांचे विश्वासू असलेल्या लेफ्टनंट जनरलचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या विश्वासू लोकांची एकामागून एक हत्या केली जात आहे, यामागे कोणाचा हात आहे, अन् असे का केले जात आहे, यावर देखील एक नजर टाकूया.

नेमकं काय घडलं?

मॉस्कोच्या बाहेरील भागात झालेल्या लक्ष्यित कार बॉम्ब स्फोटात रशियन लष्कराचे एक वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कलिक यांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून क्रेमलिन समर्थक व्यक्ती आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या वाढत्या हत्यांच्या मालिकेतील ही घटना आहे. रशियन सैन्याच्या जनरल स्टाफच्या मुख्य ऑपरेशन्स डायरेक्टरेटचे उपप्रमुख मोस्कलिक यांचा मॉस्को प्रदेशातील बालाशिखा शहरात झालेल्या स्फोटात मृत्यू झाला, असे वृत्त काही माध्यमांनी दिले.

Russia ukraine war

कसा झाला कारचा स्फोट?

काही माध्यमांच्या अहवालात रशियन तपास अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगण्यात आले की, हा स्फोट रिमोट बॉम्बमुळे झाला. त्याला पार्क केलेल्या गाडीत ठेवण्यात आले. त्यावेळी मोस्कलिक तेथून जात होते. त्यावेळी हा स्फोट झाला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दुसकीकडे, त्याचवेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी क्रेमलिन येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी बंद दाराआड बैठक सुरू केलेली होती, त्याचवेळी हा हल्ला झाला.

विटकॉफ, ज्यांच्याकडे औपचारिक राजनैतिक पद नाही. संभाव्य शांतता करारावर चर्चा करण्यासाठी त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत चार वेळा रशियाला भेट दिलेली आहे.

ट्रम्प यांच्याकडून युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात युक्रेनमधील युद्ध संपवणे हे प्राधान्य दिले आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, 'पुढील काही दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. सध्या बैठका सुरू आहेत. मला वाटतं आपण एक करार करणार आहोत. मला वाटतं आपण खूप जवळ येत आहोत.

दरम्यान, लेफ्टनंट जनरल मोस्कलिक यांची हत्या अगदी अशा वेळी झाली. जेव्हा शांतता चर्चा सुरू होती. यामुळे वॉशिंग्टन आणि मॉस्कोमधील नाजूक असलेल्या चर्चा आणखी गुंतागुंतीच्या होऊ शकतात.

युक्रेनने त्याची लायकी दाखवली - रशिया

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनवर दहशतवादी कारवायांचा आरोप केला. कीव्हने पुन्हा एकदा आपली लायकी दावखून दिली, असा टोला लगावला. रशियाने अधिकृतपणे या स्फोटामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केलेला नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या स्फोटाचे वर्णन दहशतवादी हल्ला असे केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

दुसरीकडे, कीववरील प्राणघातक हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका केली आणि त्यांना थांबण्यास सांगितले, असे वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने सांगितले.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "कीववरील रशियन हल्ल्यांमुळे मी खूश नाही. ते आवश्यक नव्हते आणि तो खूप चुकीचा काळ होता. दर आठवड्याला 5000 सैनिक मरत आहेत. चला शांतता करार करूया."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+