Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकीकडे शांतता कराराची चर्चा अन् रशियाने पुन्हा युक्रेनवर केला मिसाईल हल्ला, पुन्हा मृत्यूतांडव सुरू

Russia-Ukraine war News : गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपता संपेना. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत असून शहराची शहरे उद्धवस्त करू लागलेले आहेत. अशातच, शांतता करारांवर सामान्य चर्चा सुरू असताना, रशियाने युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

रशियाने रात्रीच्या वेळी उत्तरेकडील युक्रेनियन शहर डोब्रोपिलियावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात 5 मुलांसह 14 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 37 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, रशियन सैन्य डोनेस्तक प्रदेशात सतत हल्ले करत आहेत. खरं तर, रशियन सैन्य डोनबास ताब्यात घेण्याची तयारी करत आहे, म्हणून ते या प्रदेशात आपल्या आक्रमक कारवाया सुरू ठेवत आहे. वृत्तानुसार, रशियन सैन्याने शुक्रवारी रात्री हल्ला करण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, अनेक रॉकेट आणि ड्रोनचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.

russia missile attack on ukraine

8 बहुमजली इमारती उद्धवस्त, 30 वाहने जळून खाक

रशियन सैन्याच्या या हल्ल्यात आठ बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्या आणि सुमारे 30 वाहने उद्ध्वस्त झाली. या हल्ल्याबाबत युक्रेनियन मंत्रालयाकडून एक निवेदन आले आहे. ज्यामध्ये खार्किव प्रदेशातील हल्ल्यात 3 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. रशिया आपल्या लष्करी कारवाया तीव्र करत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे.

रशियन हल्ल्यावर युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया

शांतता चर्चेदरम्यान रशियन हल्ल्यांबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, असे हल्ले दर्शवितात की रशियाचे उद्दिष्ट बदललेले नाहीत. म्हणूनच, जीवांचे रक्षण करण्यासाठी, आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि रशियाविरुद्ध निर्बंध वाढवण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. पुतिन यांना त्यांच्या युद्धासाठी आर्थिक मदत करणारी कोणतीही गोष्ट संपवली पाहिजे.

अमेरिकेशी चर्चा सुरूच

एवढेच नाही तर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासोबत सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेख केला. शांतता हवी असलेल्या भागीदारांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. झेलेन्स्की म्हणाले की, पुढील आठवड्यात युरोपमध्ये, अमेरिकेसोबत आणि सौदी अरेबियामध्ये बरेच काम होईल. आम्ही शांतता वाढविण्यासाठी आणि सुरक्षेचा पाया मजबूत करण्यासाठी बैठकीची तयारी करत आहोत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+