युद्धबंदीसाठी पुतिन यांनी घातल्या कठोर अटी; डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी नेमकी कशासाठी करताहेत?
युक्रेनवर लष्करी कारवाई केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर दबाव वाढवला आहे. एका वृत्तानुसार पुतिन यांनी युद्धबंदीसाठी अनेक अटी ठेवल्या आहेत. युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही याची हमी तसेच रशियाने व्यापलेल्या चार प्रदेशांना मान्यता देणे अशा अटी घातल्याचे समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी
रशियाची अमेरिका आणि नाटोकडून मुख्य मागणी अशी आहे की त्यांनी युक्रेनच्या नाटो सदस्यत्वावर कायमची बंदी घालावी. युक्रेनने पूर्व युरोपमध्ये त्याचा विस्तार थांबवावा, अशी मागणीही रशियाने केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया-युक्रेन युद्ध सोडवण्यासाठी सौदी अरेबिया आणि तुर्कीला चर्चेत सहभागी करून घेण्याची योजना आखत आहेत. हे युद्ध थाबावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करत असल्याचे सांगितले जात आहे.
रशियाच्या प्रमुख मागण्या
- युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळू नये.
- अमेरिकेने रशियाच्या ताब्यातील चार युक्रेनियन प्रदेशांना मान्यता द्यावी.
- नाटोने पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये विस्तार करू नये.
ट्रम्प यांचा नेमका हेतू काय?
अमेरिकन प्रशासनाने रशियासोबत कोणत्या अटींवर युद्धबंदी हवी आहे, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते ट्रम्प प्रशासन रशियासोबत व्यापारी संबंध सुधारण्याचा आणि युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे. विश्लेषकांच्या मते, जर अमेरिकेने पुतिन यांच्या मागण्या मान्य केल्या तर तो रशियासाठी एक मोठा राजनैतिक विजय असेल. तथापि, युक्रेन अजूनही त्याच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करत आहे. येत्या काळात अमेरिका आणि नाटोची या मुद्द्यावरची भूमिका युद्धबंदी शक्य होईल की नाही हे ठरवेल.












Click it and Unblock the Notifications