तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल! आता रशियाचा पोलंडवर मोठा हल्ला! 19 ड्रोन डागले, जागतिक राजकारणात खळबळ
Russia launches major attack on Poland, fires 19 drones : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक शांततेला बाधा येत असून या संर्घषाचे परिणाम जगावर होत आहेत, तर दुसरीकडे रशियाने युक्रेननंतर आता पोलंडवर मोठा हल्ला केला आहे. रशियाने पोलंडवर तब्बल १९ ड्रोन पाठवत हा हल्ला केला. या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून विविध देशांच्या प्रतिक्रीया आता येत आहेत.

हल्ल्यानंतर पोलंडची प्रतिक्रिया
रशियाने पोलंडच्या हवाई हद्दीत १९ ड्रोन पाठवून पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे. पोलंडने या घटनेला "देशावर केलेला हल्ला" म्हटले आहे. नाटो (NATO) देशांच्या मदतीने हे ड्रोन पाडण्यात आले. आता यावरुन पुन्हा उभय देशांत नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
नेमकी घटना काय?
९ सप्टेंबर २०२५ रोजी रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला. याच वेळी, अनेक रशियन ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत घुसले. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, सात तासांत १९ वेळा हवाई हद्दीचे उल्लंघन झाले. यातील आठ ड्रोन कोसळले, ज्यामुळे एका गावातील घराचे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पोलंडने तातडीने हवाई हद्द बंद केली, ज्यामुळे वारसॉ येथील चोपिन विमानतळाचे कामकाजही थांबले.
रशियाला परिणाम भोगावे लागणार?
पोलंड हा नाटोचा सदस्य देश आहे. नाटोच्या नियमांनुसार, एका सदस्य देशावर हल्ला झाल्यास तो सर्व देशांवर हल्ला मानला जातो. या घटनेमुळे नाटोने रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे या घटनेवर रशियाकडून वृत्त लिहेपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
कोणत्या देशाची काय आली प्रतिक्रीया?
बेलारूसने केला 'तांत्रिक' दावा
रशियाचा मित्र देश असलेल्या बेलारूसने या घटनेचे समर्थन करताना म्हटले की, हे ड्रोन तांत्रिक बिघाडामुळे भरकटले होते. बेलारूसने पोलंडला याबद्दल आधीच माहिती दिली होती, असा दावाही त्यांनी केला.
युरोपीय देशांची भूमिका काय?
युरोपियन नेत्यांनी या घटनेला केवळ एक दुर्घटना मानण्यास नकार दिला आहे. त्यांना असे वाटते की ही रशियाची जाणूनबुजून केलेली आक्रमक कृती आहे. एकाअर्थी रशियाच्या या कृतीवर युरोपीय देशांची नाराजी दिसून आली असे दिसून येते.
रशियाने पोलंडवर का हल्ला केला?
युक्रेनच्या शेजारील देश असल्यामुळे पोलंडचे धोरणात्मक महत्त्व मोठे आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच पोलंड युक्रेनला मदत करत आहे. त्यामुळे रशियाने पोलंडवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प?
एकीकडे युक्रेनशी लढणाऱ्या रशियाने पुन्हा जागतिक संघर्ष वाढवला असे म्हटले जात आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याचे पडसाद जागतिक पातळीवर पडत आहेत. तर दुसरीकडे या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तत्पुर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर इतर अनेक देशांनी रशियाच्या कृत्याचा निषेध केला आहे.
पोलंड काय प्रत्युत्तर देणार?
युक्रेनला मदत करत असलेल्या पोलंडवर रशियाने हल्ला केल्याने आता याचे परिणाम नेमके काय होतील हे अस्पष्ट आहेत, मात्र पोलंड रशियाच्या हल्ल्यावर काय प्रत्युत्तर देतो यावर पुढची परिस्थिती अवलंबून आहे. जर नाटोने यावर कठोर कारवाई केली, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. यामुळे येत्या काळात जागतिक राजकारण आणि सुरक्षा व्यवस्थेत गंभीर बदल होऊ शकतात.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications