इराण-इस्रायल युद्धात रशियाची एंट्री; पुतिन यांचा ट्रम्प-नेतान्याहूंना इशारा?, काय म्हणाले जाणून घ्या
Iran Israel War : मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराणमधील सुरू युद्धाची परिस्थिती आता जागतिक राजकारणाचे केंद्र बनले आहे. या संवेदनशील काळात रशियाने अचानक या युद्धात एंट्री केली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. हे पाऊल जागतिक राजकीय समीकरणांमध्ये एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
दरम्यान, पुतिन यांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती समोर आली असून याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची मॉस्कोच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. पुतिन म्हणाले, 'इराणच्या अणुस्थळांवर झालेल्या हवाई हल्ल्यांबद्दल आम्हाला खेद आहे, हा हल्ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी सांगितले.

'मॉस्कोला या हल्ल्याची कोणतीही पूर्व माहिती नव्हती'
इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांवर रशियाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. सोमवारी क्रेमलिनने एक निवेदन जारी करून या कृत्याबद्दल मनापासून खेद व्यक्त केला आणि हे देखील स्पष्ट केले की मॉस्कोला या हल्ल्याबद्दल कोणतीही पूर्व माहिती देण्यात आली नव्हती. या घटनेवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक प्रतिक्रियेत म्हटले आहे की, "ही एक विनाकारण आक्रमकता आहे, जी समर्थनीय ठरू शकत नाही."
'हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे'
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले की, "आम्ही या प्रदेशात वाढत्या सहभागाचा आणि तणावाच्या पुनरुज्जीवनाचा निषेध करतो आणि या परिस्थितीबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो."
तथापि, पुतिन किंवा पेस्कोव्ह दोघांनीही त्यांच्या निवेदनात अमेरिकेचे स्पष्टपणे नाव घेतले नाही. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने हा हल्ला बेजबाबदार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे वर्णन केले आहे, जो प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो.
ईरान पर अमेरिकी हमले के बाद रूस के राष्ट्रपति पुतिन और ईरान के विदेश मंत्री अराग़ची की मॉस्को में मुलाक़ात pic.twitter.com/s5wJ8gAr8o
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) June 23, 2025
रशियाने इराणला पूर्ण पाठिंबा दिला
इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे एक विशेष पत्र पुतिन यांना सुपूर्द केले, ज्यामध्ये सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली होती. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, 'रशियाचा मध्यस्थीचा प्रस्ताव आणि अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध हे तेहरानला एक प्रकारचे समर्थन आहे. त्यांनी असेही म्हटले की भविष्यात रशिया कोणत्या प्रकारची अतिरिक्त मदत देईल हे पूर्णपणे इराणला कोणत्या पातळीची मदत हवी आहे यावर अवलंबून असेल.












Click it and Unblock the Notifications