Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ब्रिटन निवडणूकः ऋषी सुनक यांनी स्वीकारला पराभव , केयर स्टार्मर नवे पंतप्रधान

ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी पंतप्रधानपदासाठी मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचा ट्रेंड पाहता, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. ऋषी सुनक यांनी रिचमंड आणि नॉर्थलर्टनमधील जागा कायम ठेवल्या आहेत.

ते म्हणाले की, या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पक्षाचा विजय झाला असून मी केयर स्टार्मर यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला आहे. मी आता लंडनला जाणार आहे. तेथे मी निवडणूक निकालांबाबत विचारमंथन करेन. पंतप्रधानपद भूषवताना मी माझ्या कार्यकाळात बरीच कामे केली. माझ्याकडे जे काही होते ते मी सर्व केले.

keir starmer

एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टी पुढे होती

मतदानानंतर, केयर स्टार्मर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होणार असे एक्झिट पोलमध्ये समोर आले होते. त्यांचा लेबर पक्ष संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होईल, तर एक्झिट पोलने ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली होती.

650 जागांच्या संसदेत लेबर पार्टी 410 जागा जिंकेल असे एक्झिट पोलने दाखवले आहे, ज्यामुळे 14 वर्षे जुने कंझर्वेटिव्ह-नेतृत्वाचे सरकार यावेळी कोसळेल. आतापर्यंतच्या मतमोजणीवरून तेच दिसून येत आहे.

सुनक यांच्या पक्षाला केवळ 131 जागा मिळतील, असा अंदाज आहे, तर यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 346 जागा मिळाल्या होत्या. यावेळी कंझर्व्हेटिव्हच्या या स्थितीमागे पक्षांतर्गत सुरू असलेली लढाई असल्याचे सांगितले जात आहे.

स्टार्मर यांनी जनतेचे आभार मानले

पक्षाला मिळत असलेला मोठा पाठिंबा पाहून केयर स्टारर यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही त्यांच्यासाठीही आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्मर यांनी जनतेला सांगितले की, मी तुमच्यासाठी बोलेन, तुमच्यासाठी रोज लढेन, बदलासाठी तयार आहे. स्टार्मर म्हणाले, बदलाची सुरुवात आता तुमच्या मताने होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+