जीवघेण्या हल्ल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांना 2378 प्रतिनिधींची मते मिळाली. उमेदवार निवडण्यासाठी 1215 मतांची आवश्यकता आहे.
मिलवॉकी येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली आहे. चार दिवसाच्या बैठकीच्या शेवटी प्राईम टाईम च्या भाषणादरम्यान ट्रम्प औपचारिकपणे अर्ज स्वीकारतील.

ट्रम्प यांच्यावर झाला होता हल्ला
पेन्सिलव्हेनियामध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले होते.
सुदैवाने ट्रम्प वाचले
ट्रम्प सुदैवाने वाचले असून ही देवाची कृपा असल्याचा विश्वास ट्रम्प च्या समर्थकांनी व्यक्त केला. बाईडेन यांच्या तुलनेत ट्रम्प हे अमेरिकेच्या हितासाठी योग्य पर्याय असल्याचेही मानले जात आहे. या विश्वासामुळेच धार्मिक मतदारांमध्ये ट्रम्प यांच्या समर्थनार्थ लक्षणीय वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रम्प यांच्या समर्थनार्थ झेंडे फडकवले
पेन्सिल्व्हेनिया मध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते आणि समर्थक एकत्र आले असून त्यांच्या समर्थनाची लाट उसळली होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ झेंडे फडकवले. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प वडिलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होता.
डोमेक्रॅटिक पक्ष कोणाला उमेदवारी देईल हे ठरवण्यासाठी पुढील महिन्यामध्ये बैठक होणार आहे परंतु बायडेन हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत, तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांनी बाईडेन च्या उमेदवारीबद्दल वैयक्तिकरित्या चिंता व्यक्त केली आहे .












Click it and Unblock the Notifications