Rahul Gandhi UAS tour: राहुल गांधी शेजारीच अन् सॅम पित्रोदांनी काढला पप्पू हा विषय पिकला हशा, टाळ्या

Rahul Gandhi UAS tour : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. ते तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत, तिथे ते वेगवेगळ्या मंचांवर अनेक विषयांवर व्यक्त होत आहे. काल राहुल गांधी यांनी डलास येथील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रा आणि बेरोजगारीबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. टेक्साॅसमध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी मंचावरून राहुल गांधींबद्दल पप्पू संदर्भात असं काही वक्तव्य केलं की संपूर्ण सभागृहात टाळ्या आणि हशा पिकला.

सॅम पित्रोदा यांनी जेव्हा 'पप्पू' संदर्भात विषय काढला त्यावेळी मंचावर काँग्रेस नेत तथा खासदार राहुल गांधी त्यांच्या शेजारीच बसले होते. चला जाणून घेऊया सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले..

Rahul Gandhi UAS tour

प्रथम जाणून घेऊया सॅम पित्रोदा काय म्हणाले?

टेक्सासमधील आपल्या भाषणात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणाले, '...राहुल गांधींचा अजेंडा काही मोठ्या मुद्द्यांवर बोलण्याचा आहे. करोडो रुपये खर्च करून प्रचार करणाऱ्या भाजपपेक्षा त्यांची दृष्टीकोन पूर्णपणे वेगळी आहे. मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी 'पप्पू' नाही. ते खूप शिकलेले आहेत आणि कोणत्याही विषयावर खोलवर विचार करणारे रणनीतीकार आहेत.

भाजप पप्पू म्हणून उडवते खिल्ली

भाजप अनेकदा राहुल गांधींना पप्पू म्हणत त्यांची खिल्ली उडवत आहे. यावरुन सॅम पित्रोदा यांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे. ते म्हणाले, 'कधीकधी त्यांना समजून घेणे इतके सोपे नसते. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर राहुल गांधींचा विश्वास आहे.' सॅम पित्रोदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. परदेशात ते काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करतात.

गांधीवादी विचार शिक्षणाचा गाभा

सॅम पित्रोदा म्हणाले, 'पन्नासच्या दशकात आम्ही शाळेत गेलो तेव्हा गांधीवादी विचार हा आमच्या शिक्षणाचा गाभा होता. समावेश आणि विविधता हे फक्त शब्द नव्हते - त्या त्या गोष्टी होत्या ज्या आपण जगत होतो. आणि जेव्हा मी आज आपल्या समाजात बदल पाहतो जे आपल्या मूलभूत तत्त्वांवर हल्ला करतात, तेव्हा मला काळजी वाटते.

राहुल गांधींना श्रमाचा आदर याचा मला आनंद

विचार असा असावा की, आपण आपल्या लोकांचा आदर केला पाहिजे, मग त्यांची जात, धर्म, भाषा किंवा राज्य काहीही असो. सर्वांसाठी समान संधी निर्माण करूया, श्रमाचा आदर करूया आणि या मुद्द्यांचे राहुल गांधी समर्थन करत आहेत आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+