Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : पाकिस्तानमधील रेल्वे स्टेशनवर दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट, 21 जणांचा मृत्यू, डझनभर जखमी

Quetta railway station : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ दहशतवांद्याकडून बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. या बॉम्बस्फोट हल्ल्यात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक अहवालानुसार हा स्फोट रेल्वे स्टेशनच्या बुकिंग ऑफिसमध्ये झाला आहे. या रेल्वेस्थानकावर मोठ्या संख्येने लोक येतात, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस आणि बचाव कर्मचारी स्फोटाच्या ठिकाणी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. तसेच क्वेट्टा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आणि अतिरिक्त डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

pakistan quetta railway station

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी जिओ न्यूजला माहीती दिली आहे. मीडियाशी बोलताना वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) ऑपरेशन्स क्वेट्टा मुहम्मद बलोच म्हणाले की, हा स्फोट आत्मघाती स्फोट असल्याचे दिसत आहे. मात्र पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांच्या संख्येबद्दल माहिती देताना एसएसपी ऑपरेशन्स बलोच यांनी सांगितले की, स्फोटातील मृतांची संख्या 21 आहे आणि 30 जण जखमी झाले आहेत. "पेशावरकडे जाणारी एक्स्प्रेस आपल्या गंतव्यस्थानासाठी निघणार असताना रेल्वे स्थानकात हा स्फोट झाला," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या प्राणघातक घटनेचा निषेध करताना कार्यवाहक अध्यक्ष सय्यद युसूफ रझा गिलानी म्हणाले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत, ज्यांनी निष्पाप लोकांना लक्ष्य केले. दहशतवादाच्या संपूर्ण समूळ उच्चाटनासाठी सर्व शक्य उपाययोजना करण्याच्या आपल्या संकल्पाचा गिलानी यांनी पुनरुच्चार केला.

दरम्यान बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जीवघेण्या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रांतातून 'दहशतवादाचा समूळ नष्ट करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनीही या स्फोटाचा निषेध केला आहे. दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले, "क्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादाच्या या कृत्यात जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याने मला खूप दु:ख झाले आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+