रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे 'सीक्रेट' वैयक्तिक आयुष्य! एक लग्न, तीन अफेयर्स आणि पाच कथित वारस
Putin Secret Family One Wife 3 Affairs 5 Children : जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन यांची राजकीय खेळी आणि कणखर नेतृत्व सर्वश्रुत आहे. पण, क्रेमलिनच्या अभेद्य भिंतीआड त्यांचे खासगी आयुष्य मात्र नेहमीच रहस्य आणि वादग्रस्त चर्चांनी वेढलेले असते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या तीन लग्नांची चर्चा जगभर झाली, पण पुतिन यांच्या वैयक्तिक नात्यांवर पडदा नेहमीच कठोरपणे पाडलेला राहिला. एका प्रदीर्घ विवाहात घटस्फोट, त्यानंतर तीन कथित महिलांसोबतचे संबंध आणि या संबंधातून जन्मलेली कथित पाच मुले...

पुतिन यांची कौटुंबिक कहाणी एखाद्या थ्रिलर जासूसी चित्रपटापेक्षा कमी नाही. आजवर केवळ अफवा, लीक झालेल्या बातम्या आणि तपास अहवालांतून समोर आलेल्या या गोपनीय नात्यांमागे किती सत्य आणि किती 'क्रेमलिनचे कथानक' दडलेले आहे, याचा घेतलेला हा वेध...
के.जी.बी.ची पार्श्वभूमी आणि गोपनीय स्वभाव
बोल्ड स्कायनुसार, ७ ऑक्टोबर १९५२ रोजी लेनिनग्रादमध्ये एका सामान्य कामगार कुटुंबात जन्मलेल्या पुतिन यांचा प्रवास संघर्षमय होता. लहानपणीच दोन मोठ्या भावांचे निधन झाल्यामुळे, सुरुवातीच्या कौटुंबिक शोकांतिकांमुळेच त्यांचा स्वभाव अत्यंत गोपनीय बनला, असे मानले जाते. राजकारणात येण्यापूर्वी पुतिन केजीबी एजंट असल्याने त्यांच्या आयुष्यातील गोपनीयता आणि रहस्यमयता अधिकच मजबूत झाली.
ल्यूडमिला : ३० वर्षांचा अधिकृत अध्याय
पुतिन यांनी १९८३ मध्ये एअर होस्टेस ल्यूडमिला श्क्रेबनेवा यांच्याशी विवाह केला. या दोघांना दोन मुली आहेत:
मारिया वोरोन्ट्सोवा (जन्म १९८५): त्या एआय आणि एंडोक्राइनोलॉजी रिसर्चर आहेत.
कातेरिना तिखोनोवा (जन्म १९८६): त्या न्यूरोसायन्स रिसर्चर आणि ॲक्रोबॅटिक रॉक-एन-रोल डान्सर आहेत.
पुतिन यांच्या दोन्ही मुलींनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्यासाठी बनावट नावांचा वापर केला आणि अनेक वर्षे पुतिन यांनी अधिकृतपणे त्यांच्या अस्तित्वाची पुष्टी केली नाही. ३० वर्षांच्या संसारानंतर, ६ जून २०१३ रोजी या जोडप्याने टीव्हीवर एकत्र येऊन घटस्फोटाची घोषणा केली. ल्यूडमिला यांनी नंतर त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या व्यावसायिक आर्थर ओचेरेटनी यांच्याशी विवाह केला.
अलीना कबाएवा: 'पुतिनची क्लोज असोसिएट'
२००४ च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जिम्नॅस्ट अलीना कबाएवा यांच्याशी पुतिन यांचे कथित संबंध सर्वात हाय-प्रोफाइल ठरले. २००८ मध्ये एका रशियन वृत्तपत्राने त्यांच्या लग्नाचा दावा केला, जो पुतिन यांनी फेटाळला आणि ते वृत्तपत्र बंद झाले. मात्र, २०२२ मध्ये अमेरिका आणि यूकेने अलीनावर 'पुतिन यांच्या निकटवर्तीय' म्हणून निर्बंध लादल्यानंतर या नात्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळाले.
कथित वारस: अलीना आणि पुतिन यांना दोन कथित मुले असल्याचे अहवाल आहेत. 'दोषियर सेंटर'च्या २०२४ च्या तपासणीनुसार, मोठा मुलगा इवान व्लादिमिरोविच (जन्म २०१५, स्वित्झर्लंड) आणि छोटा मुलगा व्लादिमीर ज्युनिअर (जन्म २०१९, मॉस्को) हे त्यांचे पुत्र आहेत.
स्वेतलाना : तिसरे सीक्रेट नाते
अलीना व्यतिरिक्त, पुतिन यांचे नाव १९९० च्या दशकात सेंट पीटर्सबर्गमध्ये क्लीनर म्हणून काम करणाऱ्या स्वेतलाना यांच्याशीही जोडले गेले. २०२० च्या तपासणीनुसार, त्याच वेळी त्यांचे गुप्त नाते सुरू झाले. आज स्वेतलाना रशियातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असून, मीडिया आणि बँकिंग क्षेत्रात त्यांची मोठी भागीदारी आहे.
पाचवी सीक्रेट मुलगी एलिजावेता
या दोन मुली आणि दोन कथित मुलांव्यतिरिक्त, एलिजावेता क्रिवोनोगिख उर्फ लुइझा रोजोवा (जन्म २००३) ही पुतिन यांची सीक्रेट मुलगी असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांचा चेहरा पुतिन यांच्याशी मिळताजुळता असल्याचे बोलले जाते. ती सध्या पॅरिसमध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण घेत असून, डीजे म्हणूनही काम करते. अशा प्रकारे, पुतिन यांचे एक अधिकृत लग्न आणि तीन कथित संबंधांतून एकूण पाच मुले असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे, परंतु पुतिन यांनी नेहमीच आपल्या खासगी जीवनाबद्दलच्या प्रश्नांची निंदा केली आहे.












Click it and Unblock the Notifications