डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन; म्हणाले, मी उत्सुक आहे...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज शपथ घेतली. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजता ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्र्म्प यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाले मोदी
राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम मोदींनी डोनाल्ड ट्र्म्प यांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले की, दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगातील एक चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी काळासाठी शुभेच्छा.
Congratulations my dear friend President @realDonaldTrump on your historic inauguration as the 47th President of the United States! I look forward to working closely together once again, to benefit both our countries, and to shape a better future for the world. Best wishes for a…
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2025
डोनाल्ड ट्र्म्प ४७ वे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प् यांनी आज अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला ७०० पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.












Click it and Unblock the Notifications