Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला तो मुद्दा, पुतीन यांची लगेचच मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन लष्करात अडकलेल्या भारतीयांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे उपस्थित केल्यानंतर रशियाने रशियन लष्करात सेवा करणाऱ्या सर्व भारतीयांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक भारतीयांना फसवून रशियन सैन्यात भरती केल्याचे समोर आले होते. रशिया-युक्रेन युद्धात डझनभर भारतीय रशियन सैन्यात अडकले असून अनेक भारतीय आघाडीवर तैनात आहेत.

modi putin meet

रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर मॉस्कोमध्ये असलेले पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत एका खासगी डिनरमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. ज्यावर रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीयांना बडतर्फ करून त्यांना भारतात परतण्यास मदत करण्याचे मान्य केले.

रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीयांचा व्हिडिओ व्हायरल

एजंटांनी चांगल्या पगाराचे आमिष दाखवून सुमारे दोन डझन भारतीयांना रशियन लष्करात सामावून घेतले आहे. हे भारतीय युक्रेन युद्धात आघाडीवर तैनात आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणातील काही लोक रशियन सैन्याच्या गणवेशात दिसत होते.

या व्हिडीओमध्ये या भारतीयांनी दावा केला आहे की, युक्रेनमध्ये युद्ध करताना आपली फसवणूक झाली आहे. या भारतीयांनी त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

भारताने रशियावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत सरकारने रशियासमोर हा मुद्दा उपस्थित केला. फसवणूक करून आणि खोटी आश्वासने देऊन भारतीयांना परदेशात पाठवणाऱ्या एजंटांवर कारवाई केली जाईल, असेही सरकारने म्हटले होते.

यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी अशा एजंटांवर कारवाई केली आणि भारतीयांची तस्करी करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश केला. या एजंटांनी किमान 35 भारतीयांना रशियात पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. डिनरमध्ये पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा

दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी सोमवारी संध्याकाळी मॉस्कोला पोहोचले. रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि मॉस्को येथे होणाऱ्या २२व्या भारत-रशिया शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+