Pope Francis Death : पोप फ्रान्सिस यांचे निधन; या फोटो-इमेज आणि संदेशासह त्यांना द्या श्रद्धांजली
Pope Francis Death tribute shradhanjali message photo : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी पोप यांनी अखेरचा श्वास घेतला. पोप यांचे आज स्थानिक वेळेनुसार सकाळी दीर्घ आजाराने 7:35 वाजता निधन झाले.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आठवणी आणि मार्गदर्शन अनेकांसाठी मोलाचे होते म्हणूनच आम्ही येथे काही श्रद्धांजली संदेश देत आहोत.

पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते.

गेल्या काही महिन्यांपासून पोप फ्रान्सिस हे फुफुस आणि मुत्रपिंडाच्या समस्येनी त्रस्त होते. पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर जगभरात दुःख व्यक्त होत आहे.

पोपचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनामधील फ्लोरेन्स येथे झाला.

पोप होण्यापूर्वी ते जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ या नावाने ओळखले जात होते.

पोप फ्रान्सिसचे आजी-आजोबा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीपासून वाचण्यासाठी इटली सोडून अर्जेंटिनाला गेले. पोपने त्यांचे बहुतेक आयुष्य अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये घालवले आहे.

पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू होते. जे 2013 मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप बनले.

पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून पोप फ्रान्सिस यांना निवडण्यात आले होते.

पोप फ्रान्सिस हे गेल्या 1000 वर्षात पहिले व्यक्ती होते, जे युरोपियन नव्हते परंतु कॅथोलिक धर्मात सर्वोच्च पदावर पोहोचले.













Click it and Unblock the Notifications