Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकव्याप्त काश्मीर पेटले! सरकारविरोधात लोक रस्त्यावर; आर्मी ताफ्यावर दगडफेक, नेमका वाद काय?

POK people vs Pakistan army : पाकव्याप्त काश्मीर (POK) च्या तीन प्रमुख शहरांमध्ये पाकिस्तान सरकारविरुद्ध निदर्शने सुरूच आहेत. पीओकेच्या अवामी कृती समिती (AAC) ने केलेल्या आवाहनानंतर सोमवारी संपूर्ण प्रदेशात दुकाने, बाजारपेठा आणि रस्ते बंद ठेवण्यात आले.

महागाई, बेरोजगारी आणि पाकिस्तानी सैन्याच्या अतिरेक्यांचा निषेध करण्यासाठी स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. सुरक्षा दलाच्या ताफ्यांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सद्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभरात काय काय घडले, अन् त्यांनी शरीफ सरकारला का आवाहन दिले, याविषयी जाणून घ्या सर्व काही.

POK Protests 2025

सरकारने कडक सुरक्षा तैनात केली

कोटली, रावलकोट आणि मुझफ्फराबाद सारख्या शहरांमध्ये हजारो लोक "आझादी" आणि "पाकिस्तानी सैन्य परत जा" असे नारे देत आहेत. निदर्शने दडपण्यासाठी सरकारने कडक सुरक्षा तैनात केली आहे.

एएसी नेते शौकत नवाज मीर म्हणाले, "आम्ही फक्त आमचे हक्क मागत आहोत, जे आम्हाला ७० वर्षांपासून मिळालेले नाहीत. आता सरकारला आमचे हक्क द्यावे लागतील."

एएसीच्या प्रमुख मागण्या काय?

पाकिस्तानात स्थायिक झालेल्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ विधानसभा जागा रद्द करण्याची मागणी. वीज प्रकल्पांनी स्थानिक लोकांच्या फायद्यांचा विचार करावा. महागाईने लोक त्रस्त असल्याने पीठ आणि वीज बिलांवर सवलत देण्याची मागणी, यासह जवळपास 32 प्रकारच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

पीओकेमध्ये पत्रकारांना नो एंट्री!

पाकिस्तान सरकारने पीओकेमध्ये पत्रकार आणि पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. स्थानिक पत्रकारही असा आरोप करत आहेत की त्यांना तटस्थ कव्हरेज देण्यापासून रोखले जात आहे. अनेक मानवाधिकार संघटना देखील या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. दुसरी बाब म्हणजे, पीओकेमध्ये मध्यरात्रीपासून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सरकारला भीती आहे की हे निदर्शने स्वातंत्र्याच्या व्यापक मागणीत रूपांतरित होऊ शकतात.

पीओकेमध्ये यापूर्वीही झालेत उठाव!

पीओकेमध्ये यापूर्वीही अनेक वेळा सैन्य आणि सरकारविरुद्ध निदर्शने झाली आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात, स्वस्त पीठ आणि वीज मिळावी यासाठी लोकांनी संप पुकारला होता. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये, लोक वाढीव वीज किमती आणि गव्हाचे अनुदान रद्द करण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. २०२२ मध्ये, लोकांनी रस्ते अडवले आणि सरकारी कायद्याविरुद्ध स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+