Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'भारत तटस्थ नाही, शांततेच्या बाजूने उभा', पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

PM Modi on Russia Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 'भारत तटस्थ नाही, पण तो शांततेच्या बाजूने उभा आहे, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युध्द संपवण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे मोदींनी कौतूक केलं. भारत नेहमीच शांततेचा समर्थक राहिला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले."हा युद्धाचा काळ नाही" आणि त्यांनी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना यापूर्वीही सांगितलं असल्याची आठवण करुन दिली.

pm narendra modi

रशिया-युक्रेन युद्धावर मोदींची भूमिका का महत्त्वाची आहे?

रशिया-युक्रेन यांच्यात 2022 पासून युद्ध सुरू आहे. जगातील अनेक देशांचे त्यावर वेगवेगळे मत आहे. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे आणि दोन्ही देशांना संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

मोदींनी घेतला शांततेसाठी पुढाकार

युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

व्हाईट हाऊसमधील या बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, अलीकडेच रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांशी स्वतंत्र फोन कॉलवर चर्चा केली आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल अनेक युरोपीय देशांना आश्चर्यचकित करणारे होते, कारण त्यांना या चर्चेत युक्रेनचा पूर्णपणे समावेश हवा होता.

ट्रम्प आणि मोदी यांच्यातील भेट का खास आहे?

व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ही भेट भारत-अमेरिका संबंधांसाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

व्यापार आणि गुंतवणूक - अमेरिका आणि भारत यांच्यात नवीन व्यापार करार होण्याची शक्यता.

संरक्षण सहकार्य - भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा.

तांत्रिक सहकार्य - कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात सहकार्य.

इमिग्रेशन धोरण - अमेरिकेतील भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन संधींबद्दल चर्चा.

पंतप्रधान मोदींना 'जुने मित्र' म्हणत ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिकेतील संबंध आता अधिक मजबूत होतील.

ट्रम्प-मोदी भेटीचे महत्त्वाचे मुद्दे

व्हाईट हाऊसमध्ये स्वागत: ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

रशिया-युक्रेन शांतता चर्चा: मोदींनी भारताच्या शांतता प्रयत्नांचा पुनरुच्चार केला, ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनशी फोनवरून संवाद साधला.

व्यापार करार: ट्रम्प म्हणाले की, "ही यात्रा उत्तम व्यापार करारांची सुरुवात असेल."

टॅरिफ चर्चा: ट्रम्प यांनी सर्व देशांवर परस्पर टॅरिफची घोषणा केली, ज्याचा भारतावर परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेच्या करप्रणालीचा भारतावर परिणाम होईल का?

- अमेरिकेने अलीकडेच काही देशांवर उच्च आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली. दरम्यान भारताला आशा आहे की या वाढीव शुल्कातून सूट मिळू शकेल.

- अमेरिकेची व्यापार तूट कमी करण्यासाठी हे शुल्क आवश्यक आहे, असे ट्रम्प यांचे मत आहे. परंतु भारत त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वाटाघाटी होऊ शकते.

- या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक असलेले अब्जाधीश एलोन मस्क यांची ही भेट घेतली.

या बैठकीचा भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम

व्यापार: नवीन करार आणि संभाव्य टॅरिफ सूट यावर वाटाघाटी.

संरक्षण: अमेरिका आणि भारत यांच्यातील लष्करी सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी चर्चा.

युक्रेन संकट: भारताने शांततेसाठी आपली भूमिका स्पष्ट केली, अमेरिका आणि युरोपीय देशांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असेल.

तांत्रिक सहकार्य: कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर उद्योगात सहकार्याला प्रोत्साहन देणे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+