बालपण ते आरएसएस, गुजरात दंगलीपासून ट्रम्पपर्यंत; मोदींच्या पाॅडकास्टमधले 7 महत्त्वाचे मुद्दे वाचा...
प्रसिद्ध अमेरिकान पाॅडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी मोदींचा पाॅडकास्ट घेतला. हा पाॅडकास्ट तब्बल तीन तास चालला. लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान मोदींशी बोलण्यापूर्वी ४५ तास उपवास केला होता. या पाॅडकास्टमध्ये मोदींनी आपल्या आयुष्याचे अनेक पैलू जगासमोर मांडले. आपले बालपण, गुरु, आरएसएसची शिकवण, राजकारण याबद्दल त्यांनी या पाॅडकास्टमध्ये माहिती दिली. मोदींच्या या मुलाखतीतील सात महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात...

१. आरएसएस
तुम्ही जे काही कराल, ते एका उद्देशाने करा, हे मला आरएसएसने शिकवले. जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी पुरेसे शिकण्याच्या ध्येयाने अभ्यास करा. जर तुम्ही व्यायाम करत असाल, तर देशाची सेवा करण्यासाठी तुमचे शरीर मजबूत बनवण्याच्या उद्देशाने करा.
२. आंतरराष्ट्रीय राजकारण
कोविडने प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना जागतिक नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्या. स्थिरता राखण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था प्रासंगिकता गमावत आहेत. कायद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना कोणतेही परिणाम भोगावे लागत नाहीत.
३. गुजरात दंगल
मी २४ फेब्रुवारी २००२ रोजी पहिल्यांदाच निवडून आलो. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा घटना घडली. हिंसाचार उफाळला. ही दंगल दुःखद होती. परंतु त्यानंतर राज्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्तापित करण्यात यश आले. सरकारवर अनेक आरोप झाले. परंतु, दोन तपासांनंतर न्यायव्यवस्थेने निर्दोष सोडले.
४.पाकिस्तान
दहशतीखाली जगण्याचा पाकिस्तानच्या जनतेला कंटाळा आला असेल. २०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार होतो, तेव्हा मी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना खास आमंत्रित केले होते. दोन्ही देश एक नवीन अध्याय सुरू करतील अशी आशा होती. परंतु त्यांनी विश्वासघात केला.
५. चीनसोबतचे संबंध
भारत-चीनमध्ये संघर्ष नाही तर स्पर्धा असावी. राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीनंतर सीमेवर परिस्थिती सामान्य झाली. विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल, पण आम्ही संवादासाठी वचनबद्ध आहोत. २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे. भारत आणि चीनने स्वाभाविकपणे स्पर्धा करावी, सामना नाही.
६. डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्पवर ट्रम्प धाडसी आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. ह्युस्टनमधील एका कार्यक्रमात मी भाषण देत होतो आणि ट्रम्प श्रोत्यांमध्ये बसून ते ऐकत होते. हजारो लोक उपस्थित होते. भाषण झाल्यावर मी ट्रम्प यांना स्टेडिअमला फेरी मारण्याची व लोकांचे आभार मानण्याची विनंती केली. त्यांनी ती तत्काळ ऐकली.
७. जनतेविषयी
माझी ताकद मोदी नाही, तर १४० कोटी देशवासीय आहेत. मी जिथे जातो तिथे मोदी जात नाहीत, १४० कोटी लोकांचा विश्वास तिथे जातो. म्हणूनच जेव्हा मी कोणत्याही जागतिक नेत्याशी हस्तांदोलन करतो, तेव्हा मोदी हस्तांदोलन करत नाहीत. त्याला १४० कोटी लोकांचा पाठिंबा आहे. ही शक्ती मोदींची नाही तर भारताची आहे.












Click it and Unblock the Notifications