पधारो म्हारो देस, ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांना मोदींचे आमंत्रण
नवी दिल्ली : ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर व त्यांच्या लेबर पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी स्टार्मर यांचे अभिनंदन करून त्यांना भारतात आमंत्रित केले. भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी शनिवारी फोनवर चर्चा केली.

यादरम्यान पीएम मोदी आणि स्टार्मर यांनी भारत-यूके संबंधांची आठवण करून दिली. सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनाही भारत भेटीचे निमंत्रण दिले.
ब्रिटनमध्ये सत्तांतर होऊन मजूर पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. ऋषी सुनक यांचा पराभव करत स्टार्मर यांनी सत्ता स्थापन केली. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी स्टार्मर यांच्याशी संवाद साधताना ब्रिटनच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचे कौतुक केले. मोदी आणि स्टॉर्मर यांनी लोकांशी घनिष्ठ संबंध वाढवण्याचे मान्य केले.
परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक संबंधांचे स्मरण केले. पीएम मोदींनी स्टॉर्मर यांना लवकरच भारत भेटीचे निमंत्रण दिले आणि दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.
मोदी म्हणाले, आम्ही वचनबद्ध
पीएम मोदींनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'केयर स्टॉर्मरशी बोलून आनंद झाला. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या लोकांच्या प्रगती, समृद्धी आणि जागतिक कल्याणासाठी आम्ही सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आग्रह धरतो. त्याच वेळी, आम्ही भारत-ब्रिटनमधील मजबूत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
पीएम मोदींनी पुढे लिहिले की, 'ब्रिटिश सार्वत्रिक निवडणुकीत विजयाबद्दल केयर स्टॉर्मरचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. परस्पर विकास आणि समृद्धीला चालना देऊन सर्व क्षेत्रांमध्ये भारत-यूके व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी सकारात्मक आणि रचनात्मक सहकार्याची अपेक्षा करतो.'












Click it and Unblock the Notifications