Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आईच्या आठवणीने मोदीजी भावूक; विदेशी पाॅडकास्टरसमोर उघडली आयुष्याची पाने, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी आज मुलाखत घेतली. एखाद्या परदेशी खासगी माध्यमाला दिलेली मोदी यांची ही पहिलीच प्रदीर्घ मुलाखत होती. लेक्स फ्रिडमॅन यांनी मोदींना विविध विषयांवर बोलते केले. आपला प्रवास मोदींनी या पाॅडकास्टमधून मांडला. ही मुलाखत संपूर्ण जगाने पाहिली.

pm modi lex fridman podcast

आईविषयी कृतज्ञता

या मुलाखतीत मोदीजींनी त्यांच्या आयुष्याचा हळवा कप्पा असलेल्या आपल्या आईबाबत मन मोकळे केले. मी आज जो काही आहे, तो माझे आई-वडील व गुरुंमुळेच आहे अशी प्रांजळ कबूली मोदीजींनी दिली. परोपकार आणि सेवाभाव हा मला माझ्या कुटुंबाकडून मिळाल्याचे मोदींनी सांगितले. ते म्हणाले, "आम्हा सर्व भावंडांना लवकर उठायचो. आई सर्वांची काळजी घ्यायची. समाजाविषयी तिचा विशेष सेवाभाव होता. त्यावेळचे अनुभव आजही मला प्रेरित करतात. समाजाविषयी सहानुभूती, दुसऱ्याचे भले करण्याची इच्छा, हे सर्व मूल्य, गुण मला माझ्या कुटुंबाकडून मिळाले आहे.

बालपणीच्या आठवणी ताज्या

या मुलाखतीत मोदींनी आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. हातात काही नसताही लहानपणी कुटुंब कसे सुखी होते, याची आठवणी मोदीजींनी सांगितली. ते म्हणाले, आम्ही निश्चिंत जगलो. आमच्याकडे जे काही होते, त्यातच आम्ही आनंद मानला. परिस्थितीविषयी तक्रार केली नाही. माझ्या आईला घरगुती उपचारांची माहिती होती. त्यामुळे ती गावातील लहान मुलांवर उपचार करायची. भल्या पहाटे लोक आमच्या घरी यायला सुरुवात व्हायची. लोक यायला लागली की आम्हालाही लवकर उठावे लागायचे, असा अनुभव त्यांनी हसत हसत सांगितला.

मोदींवर विवेकानंदांचा प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव असल्याचे सांगितले. ते म्हणाले, लहानपणी ग्रंथालयात जाण्याची सवय लागली. त्यात विवेकानंद, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यावरील पुस्तके वाचायला मिळाली. हे दोन्ही मला खुप आवडायचे. मोदींनी या गुरुशिष्याची एक आठवणही या पाॅडकास्टमध्ये सांगितली. ते म्हणाले, स्वामी विवेकानंदांची आई जेव्हा आजारी पडली तेव्हा ते गुरु रामकृष्ण परमहंसाकडे गेले. गुरु परमहंसांनी त्यांना कालीमातेची पूजा करायला सांगितले. स्वामी विवेकानंद जेव्हा आईच्या आरोग्यासाठी कालीमातेची पुजा करु लागले तेव्हा त्यांनी आईसाठी काही मागितलेच नाही. कारण आत्तापर्यंत कालीमातेने जे दिले होते, तेही कमी नव्हते. परोपकार हीच ईश्वरसेवा आहे, हा मंत्र मला त्या गोष्टीतून कळाला असे मोदीजींनी आवर्जून नमुद केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+