'आमची भेट म्हणजे एक आणि एक मेक 11', ट्रम्प यांना मिठी मारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले
PM Modi Donald Trump Meet: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी रात्री भेट घेतली. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची आजची ही पहीलीच भेट होती. ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधानांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना आपला जुना चांगला मित्र असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिका आणि भारताच्या प्रमुख नेत्यांमधील ही बैठक सुमारे एक तास चालली. या बैठकीनंतर, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधानांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. व्हाईट हाऊसमध्ये जमलेल्या जागतिक माध्यमांना संबोधित करताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपला जुना मित्र असल्याचं म्हटलं.

ट्रम्प म्हणाले की भारत अमेरिकेकडून तेल आणि वायू खरेदी करेल आणि व्यापारावर चर्चा करेल. ट्रम्प म्हणाले की मोदी उत्तम काम करत आहेत आणि भारत आणि अमेरिका नेहमीच चांगले मित्र राहतील.
मिडीयाने ट्रम्प यांना विचारले की जर तुम्ही भारतासोबत कठोर असाल तर तुम्ही चीनला कसे हरवाल? या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "आपण कोणालाही हरवू शकतो, पण आपण कोणालाही हरवण्याचा विचार करत नाही." ट्रम्प म्हणाले की आम्ही 4 वर्षांपासून चांगले काम करत होतो पण आम्हाला थांबवण्यात आलं आणि अमेरिकेत एक अतिशय वाईट प्रशासन सत्तेवर आलं. आता आपण चांगले काम सुरू ठेवू आणि अधिक मजबूत होऊ, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
"भारत आमच्याकडून तेल आणि वायू खरेदी करेल"
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, आमच्या मागील सरकारच्या काळात दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध होते आणि यावेळीही आम्ही ते सुरू केले आहे. ट्रम्प म्हणाले की, आपल्याकडे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त तेल आणि वायू आहे. भारत आमच्याकडून तेल आणि वायू खरेदी करेल.
ट्रम्प यांनी या घोषणा केल्या
ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गेल्या कार्यकाळात भारत भेटीदरम्यान दाखवलेल्या आदरातिथ्याची आठवण करून दिली आणि देशांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी एक चौकट जाहीर केली. ट्रम्प म्हणाले की 2025 मध्ये अब्जावधी डॉलर्सची अधिक संरक्षण विक्री सुरू होत आहे. ते म्हणाले की इंडो-पॅसिफिक मजबूत केले पाहिजे. तेहव्वुर राणाला लवकरच भारतात प्रत्यार्पण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
"आमची बैठक म्हणजे एक आणि एक मिळून 11"
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला विकसित देश बनवणे ही 1.4 अब्ज भारतीयांची आकांक्षा आणि संकल्प आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची भेट म्हणजे एक आणि एक मेक 11 जे मानवतेसाठी एकत्र काम करतील.
ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये पाहून आनंद झाला- मोदी
ट्रम्प यांनी माझे जुन्या मित्रासारखे स्वागत केले, तर पंतप्रधान मोदींनी ट्रम्पबद्दल सांगितले की, "डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये पाहून मला आनंद झाला. ट्रम्प यांनी माझे जुन्या मित्रासारखे स्वागत केले. त्यांनी मला नमस्ते ट्रम्प आणि हाउडी मोदी यांची आठवण करून दिली."
भारत-अमेरिका भागीदारी मानवतेला लाभदायक ठरेल
पंतप्रधान मोदी म्हणाले, "तिसऱ्यांदा केंद्र सरकार चालवण्याची संधी दिल्याबद्दल मी भारतीय जनतेचे आभार मानतो. आम्ही पूर्ण उर्जेने आणि उत्साहाने एकत्र काम करू. भारत-अमेरिका भागीदारी मानवतेला लाभदायक ठरेल असे ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प आपल्याला मेक अमेरिका ग्रेट अगेनची आठवण करून देतात."












Click it and Unblock the Notifications