न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना, पाकिस्तानी नागरिकाला अटक
Pakistani Young Boy Arrested : कॅनडात राहणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला दहशतवादी संघटना आयसिस ला मदत आणि सामग्री पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. मोहम्मद शाहजेब खान असे या 20 वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्यावर 7 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप आहे. तो आयएसच्या नावाने अनेकांना ठार मारण्याची योजना आखत होता.
न्याय विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाहजेबने 7 ऑक्टोबर रोजी अनेक ज्यूंना मारण्याची योजना आखली होती. एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी खानची योजना हाणून पाडल्याबद्दल एफबीआय टीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

रे यांनी म्हटले की, "आरोपी कथितपणे युनायटेड स्टेट्समधील ज्यू लोकांना ठार मारण्याची योजना आखत होता," इस्रायलवर हमासच्या भीषण हल्ल्यानंतर त्याच्याकडून हल्ल्याची योजना करण्यात आली होती. दहशतवादाशी लढणे ही एफबीआयची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे रे यांनी सांगितले.
ब्रुकलिनमधील ज्यू सेंटरमध्ये सामूहिक गोळीबार करण्यासाठी शाहजेब खानने कॅनडाहून न्यूयॉर्क शहराला जाण्याची योजना आखली होती. त्याने नोव्हेंबर 2023 च्या आसपास सोशल मीडियावर आयसिस च्या समर्थनार्थ सामग्री पोस्ट केली आणि एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे इतरांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने आयसिसच्या प्रचाराचे व्हिडिओ आणि साहित्य शेअर केले.












Click it and Unblock the Notifications