पाकिस्तानी ब्लॉगरने कोलकाता प्रकरणावर शेअर केली कविता, पोलिसांकडून अटक
कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टराच्या बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणानंतर एका पाकिस्तानी महिला ब्लॉगरला महिलांच्या छळावर सोशल मीडियावर कविता लिहिणे महागात पडले. ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली तिला तुरुंगात टाकण्यात आले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारी ब्लॉगर अस्मा बतूल हिने महिलांवरील अत्याचारावर एक कविता शेअर केली होती. तिने सोशल मीडियावर लिहिले,'बलात्कार झाला तेव्हा अल्लाह, देव किंवा ईश्वर,सगळे उपस्थित होते.तिने फेसबुकशिवाय इंस्टाग्रामवरही एक पोस्ट लिहिली, यानंतर अनेक मौलवींनी अस्मावर अल्लाहचा अपमान केल्याचा आरोप केला.यानंतर तिच्यावर गुन्हाही दाखल झाला. नंतर पोलिसांनी तिला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक केली.

जमावाचा घरावर हल्ला,जीवे मारण्याची धमकी
या घटनेनंतर जमावाने अस्माच्या घरावर हल्ला केला, ज्याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात काही मौलवीही दिसत आहेत, अशी तक्रार अस्माच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. जीवे मारण्याची धमकी देऊन घर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पीडितांनी सांगितले. दरम्यान काही लोक ब्लॉगर्स भूमिकेचे समर्थन करत आहेत. तिच्या सुटकेची मागणी होत आहे. एका पत्रकाराने एक्स वर लिहिले की,अस्मा बतूल यांना सोशल मीडियावर कविता शेअर केल्याबद्दल ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, तुमचा विश्वास असो वा नसो हा पाकिस्तान आहे.
सोशल मीडियावर अस्माला समर्थन
यावर एका युजरने लिहिले हे घृणास्पद आहे आणि मला खरोखर समजत नाही की आपण हे कसे उलट करू शकतो. त्याचवेळी मानवाधिकारांवर काम करणाऱ्या गुलालाई यांनीही त्यांच्या अटकेचा निषेध केला. त्यांनी लिहिले की ईशनिंदा कायदा हा नवीन देशद्रोह कायदा आहे, जो असहमत लोकांना शिक्षा करण्यासाठी वापरला जात आहे. आता या प्रकरणाला पाकिस्तानात महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोण आहे अस्मा बतूल?
अस्मा बतूल पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सोशल मीडियावर सक्रियपणे आवाज उठवत आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर होळी साजरी करतानाचे आणि काश्मीरमधील लोकांबद्दल बोलतानाचे अनेक व्हिडिओ आहेत.आता अस्माच्या अटकेमुळे सोशल मीडिया यूजर्स चिंतेत आहेत. तिचे आता काय होणार हे जाणून घेण्याचीही उत्सुकता आहे.












Click it and Unblock the Notifications