भारतासमोर लोटांगण तरीही असीफ मुनीर यांची सर्वोच्चपदी बढती! कोण आहेत पाकचे हे लष्करप्रमुख? जाणून घ्या
Pakistani Army Chief Asim Munir Promoted To Field Marshal : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानने भारतासमोर नांग्या टाकल्या आणि युद्धविराम करण्यासंबंधी विनवनी केली. पाकिस्तानची हि विनंती भारताने मान्य केली आणि युद्धविराम सुरु झाला. एवढी गच्छंती कधी झाली नाही तेवढी पाकिस्तानच्या लष्करप्रमुख आणि त्यांच्या लष्कराची तसंच सरकारची झाली. नांग्या टाकूनही पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे हे विशेष..
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती देण्यात आली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाने या पदोन्नतीला 'मंजूर' दिल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. खास बाब म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी आयुधाची राखरांगोळी भारताने केली. कराचीवर हल्ले चढवले. त्यांच्या रडार सिस्टीमचे मोठे नुकसान केले एकूणच भारताने पाकिस्तानचे पाणीपत केले. त्यानंतर पिछेहाट झालेल्या पाकिस्तानी लष्करप्रमुखाला हा सन्मान देणे म्हणजे पाकिस्तान जगाच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचेही काहींचे मत आहे.

कुणाला मिळतो हा सन्मान
पाकिस्तानने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना दिलेली फील्ड मार्शल ही सर्वोच्च लष्करी पदावरील बढती हा सन्मान असतो. पाकिस्तानच्या कायद्यानुसार, हा सन्मान क्वचित प्रसंगी आणि सशस्त्र दलातील कारकिर्दीत उत्कृष्ट ऑपरेशन्स रेकॉर्ड साध्य केल्याबद्दल दिला जातो, आता असीम मुनीर यांनी काय मोठी 'कामगिरी' केली हे सर्व जगालाच माहिती झालेय.
मुनीर हे पाकिस्तानचे दुसरे फिल्ड मार्शल बनले आहेत. यापुर्वी जनरल आयुब खान यांनी स्वःतलाच फिल्डमार्शल म्हणून घोषित केलेले होते. फिल्ड मार्शल ही बढती दिल्यानंतर लष्करप्रमुखाला निवृत्तीचे कोणतेही वय राहत नाही असे मानले जाते.
विचित्र अन् आश्चर्यकारक निर्णय
पाकिस्तान सरकारने जो निर्णय घेतला तो फारच मिश्किल आणि आश्चर्यकारक निर्णय असल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने लष्करप्रमुखांना बढती देण्याचा प्रस्ताव 'मंजूर' केला आहे.
कधी घेतला हा निर्णय
जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर भारताने सिंदूर ऑपरेशन राबवले. त्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर काही दिवसांतच असीम मुनीर यांच्या बढतीची घोषणा करण्यात आली आहे आहे.
कोण आहे असीम मुनीर
रिपोर्टनुसार, सय्यद असीम मुनीर यांचा जन्म रावळपिंडी, पाकिस्तान येथे एका पंजाबी मुस्लिम सय्यद कुटुंबात झाला. त्यांचे मूळ जालंधर, पंजाब, भारत येथे आहे, तेथून त्यांचे पालक 1947 च्या भारताच्या फाळणीनंतर स्थलांतरित झाले. ढेरी हसनाबाद, रावळपिंडी येथे स्थायिक होण्यापूर्वी ते टोबा टेक सिंग येथे गेले.
मुनीर यांनी आपले सुरुवातीचे धार्मिक शिक्षण मरकाझी मदरसा दार-उल-ताजवीद, रावळपिंडी येथील पारंपारिक इस्लामिक मदरसा येथे घेतले. ते त्यांच्या तारुण्यात स्थानिक क्रिकेटपटू देखील होते तसेच ते वेगवान गोलंदाजी करायचे. मुनीर यांनी फुजी स्कूल, जपान, कमांड अँड स्टाफ कॉलेज, क्वेटा, मलेशियन आर्म्ड फोर्सेस कॉलेज, क्वालालंपूर आणि नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, इस्लामाबाद येथून पदवी प्राप्त केली आहे.
लष्करात दाखल
मुनीर यांची फ्रंटियर फोर्स रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 25 एप्रिल 1986 रोजी त्यांनी लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल म्हणून नंतर ब्रिगेडियर म्हणून, मग मेजर जनरल पदावर बढती देण्यात आली. मुनीर यांना सप्टेंबर 2018 मध्ये लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची आयएसआय डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2022 पासून पाकिस्तानचे बनले लष्करप्रमुख
मुनीर हे 27 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते. लष्करप्रमुख (COAS) म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, त्यांनी त्यांचा निवृत्ती अर्ज सादर केला होता जो नंतर संरक्षण मंत्रालयाने नाकारला आणि सरकारने त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मुनीर हे धर्माच्या बाबतीत तो पुराणमतवादी मानला जातात. "पाकिस्तान प्रथम" हे धोरण आहे.
दहशतवादी हल्ल्यापूर्वीचे जातीय भाषण
प्रक्षोभक भाषणासाठी जनरल असीम मुनीर प्रसिद्ध आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्यापुर्वी प्रक्षोभक आणि जातीयवादी भाषण केले आणि धार्मिकदृष्ट्या प्रेरित करुन भारताविरोधात गरळ ओकली होती. रिपोर्टनुसार, असे मानले जाते की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे कारण हे भाषण आहे, 22 एप्रिल 2025 पहलगाम हल्ल्यात भारतीय 26 नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाला धर्म विचारुन ठार करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications