पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ला करणार ? शेजारील देश युद्धाच्या उंबरठ्यावर!

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशाचे संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. यापुर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला होता. त्यावेळी 46 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. अफगाणिस्तानने याला क्रूर कृत्य असं म्हटलं होतं.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे विशेष प्रतिनिधी सादिक खान यांनी खुलासा केला की, पाकिस्तानने तालिबान नेतृत्वाशी संबंधित आणि देशात दहशत निर्माण करणाऱ्या 500 अफगाण दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. जर अफगाण तालिबानने त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्यास नकार दिला तर इस्लामाबाद आणि काबूलमधील सहकार्याचे सर्व मार्ग संपुष्टात येऊ शकतात. पाकिस्तानचे अफगाणिस्तानमध्ये विशेष दूत राहिलेले सादिक खान यांनीही गुप्तपणे अफगाणिस्तानला हल्ल्याची धमकी दिली आहे.

Pakistan on Afghanistan

पाकिस्तानात घुसखोरी करून हल्ले करण्याची होती योजना

अलाहाबाद पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या खैबर-पख्तुनख्वामधील सुरक्षा आणि प्रशासन आव्हानांचे व्यापक मूल्यांकन या विषयावरील चर्चासत्रात बोलताना खान यांनी मोठं विधान केलं आहे. खान पुढे बोलताना म्हणाले की दहशतवादी गट टीटीपी हा दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या दहशतवादी संघटनेचे लोक उघडपणे अफगाणिस्तानात राहत आहेत आणि तेथून ते पाकिस्तानमध्ये दहशत पसरवत आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसखोरी करून हल्ले करण्याची योजना आखणाऱ्या 500 दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. त्यापैकी सुमारे अर्धेपेक्षा जास्त अफगाण नागरिक होते आणि ते तालिबान नेतृत्वाशी संबंधित आहेत.

अफगाणिस्तानातील 44 हजार गावे ताब्यात

अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रभावाबद्दलही खान यांनी चिंता व्यक्त केली. खान म्हणाले की, तालिबानने अफगाणिस्तानातील 44,000 गावांवर कब्जा केला आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तालिबानने तेथे पूर्णपणे शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था स्थापित केली आहे. जर तालिबान खरोखरच अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण ठेवत असेल, तर या दहशतवादी संघटना कोणत्याही नियंत्रणाशिवाय अफगाणिस्तानात कसे काम करत राहू शकतात?

दरम्यान पाकिस्तानची कठोर भूमिका स्पष्ट करताना खान यांनी म्हटलं की, तालिबानची नजर काही आपत्तीजनक घटनेची वाट पाहत आहे का? त्यांनी अफगाण तालिबानला अप्रत्यक्षपणे धमकी देत म्हटलं आहे की, निर्णायक कारवाई करण्यापूर्वी अफगाण लोकांना पुन्हा त्रास सहन करावा लागेल का. कारण ते गेल्या दोन दशकांपासून सहन करत आहे. याचा अर्थ, एक प्रकारे, खान यांनी अफगाणिस्तानला असा इशाराही दिला की पाकिस्तान त्यांच्यावर हल्ला करू शकतो. खान म्हणाले की जर अफगाण तालिबानने अजूनही कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही तर इस्लामाबाद आणि काबूलमधील सहकार्याचे सर्व मार्ग संपुष्टात येऊ शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+