पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला! प्रवाशांना वाहनातून बाहेर काढून झाडल्या गोळ्या, 23 ठार
Pakistan News : पाकिस्तानमध्ये मोठ दहशतवादी हल्ला झाला असून यात 23 लोकांना ठार करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी नैऋत्य पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्या दहशतवाद्यांनी कमीतकमी 23 लोकांना त्यांच्या वाहनांमधून जबरदस्तीने काढून टाकून ठार केले, जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, हे सर्व प्रवासी होते ज्यांना वाहनांमधून बाहेर काढून गोळ्या घालण्यात आल्या.
जिओच्या रिपोर्टनुसार, बलुचिस्तानच्या मुसाखेलमधील राराशम भागात बंदुकधा-या दहशतवाद्यांनी बस आणि ट्रकमधून जाणा-या प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यात किमान 23 प्रवासी ठार झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी जिओ न्यूजला ही माहिती दिली.

एएफपीच्या रिपोर्टनुसार, बलुचिस्तान प्रांतातील मुसाखैल जिल्ह्यात अतिरेक्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन थांबवल्या आणि जातीयतेनुसार ओळख पटवून लोकांना गोळ्या घातल्या. या घटनेत पाच जण जखमीही झाले आहेत.
मुसाखाइलचे वरिष्ठ अधिकारी नजीबुल्लाह काकर यांनी एएफपीला सांगितले की, "दहशतवाद्यांनी पंजाबला बलुचिस्तानशी जोडणाऱ्या महामार्गावर अनेक बस, ट्रक आणि व्हॅन थांबवल्या, त्यात किमान 22 जण ठार झाले आणि पाच जण जखमी झाले." नजीबुल्लाह काकर म्हणाले की, " बंदुकधारी दहशतवाद्यांकडून पंजाबला जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधील लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या,"
पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र डाॅनच्या रिपोर्टनुसार सहाय्यक आयुक्त मुसाखाइल नजीब काकर यांनी सांगितले की, सशस्त्र लोकांनी मुसाखैलच्या राराशम जिल्ह्यात आंतर-प्रांतीय महामार्ग रोखला आणि प्रवाशांना खाली उतरवले त्यांच्यावर गोळ्याही झाडल्याआणि दहा वाहने पेटवून दिली.
पाकिस्तानच्या नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध
रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, राष्ट्रापती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक आणि दु:ख व्यक्त करत त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आणि शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या.राष्ट्राध्यक्ष झरदारी म्हणाले की, निरपराध लोकांची क्रूर हत्या ही संपूर्ण मानवतेची हत्या आहे आणि दोषींना शिक्षा देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "या घटनेला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल." ते म्हणाले की, देशात कोणत्याही प्रकारचा दहशतवाद मान्य नाही. राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनीही दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची अटूट वचनबद्धता व्यक्त केली. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी दहशतवादाच्या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, त्यांनी दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्यामध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून सहानुभूती आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications