Video : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं भारताविरोधातील 'ते' वक्तव्य होतंय ट्रोल; युजर्स घेताहेत मज्जा
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा वादात सापडले आहेत. पाकिस्तान आर्थिक आणि विकासाच्या बाबतीत जर भारतापेक्षा मागे पडला, तर आपले नाव शाहबाज शरीफ नाही, हे त्यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावरही ट्रोल केलं जात आहे.

नेमकं काय म्हणाले शरीफ?
पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजीखान येथे एका सभेत बोलत होते. भाषणादरम्यान ते अति उत्साहीत दिसले. पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सुरुवातीला सांगितले. त्यानंतर त्यांनी आपले सरकार पाकिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी दिवसरात्र काम करत असल्याचाही उल्लेख केला. या विधानानंतर मात्र त्यांची जीभ घसरली व ते भारताविरोधात बरळले.
🛑🛑 If I don't defeat India, my name is not Shehbaz Sharif.
— Naren Mukherjee (@NMukherjee6) February 23, 2025
We will defeat regional competitors like India in economic development.”
— Pakistan's Prime Minister
👉 Ek din isko heart attack aa jayega jitna panic hokar bolta hai. 😂😂😂👇 pic.twitter.com/IN0Cy2EQbm
'हेच' विधान होतंय ट्रोल
भाषणादरम्यान अति उत्साही झालेले शरिफ पुढे म्हणाले, की "आमच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तान भारतापेक्षा पुढे जाईल. जर तो भारतापेक्षा मागे राहिला, तर माझे नाव शाहबाज शरीफ राहणार नाही." पाकिस्तानला अधिक उंचीवर नेण्यासाठी ते आपली सर्व शक्ती पणाला लावतील, असे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच भारताला पराभूत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
भारताविरोधात ओकली गरळ
भाषणात शाहबाज शरीफ यांनी त्यांचे मोठे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "मी नवाज शरीफ यांचा चाहता आहे. मी त्यांचा अनुयायी आहे. जोपर्यंत माझ्यात ऊर्जा आणि इच्छा आहे तोपर्यंत आपण एकत्र येऊन पाकिस्तानला महान बनवू आणि भारताला पराभूत करू." शरीफ यांच्या भाषणाची हिच पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यावर भारतीय चांगलीच मजा घेत आहेत. ट्विटरवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवली जात असून त्यांच्यावर टीकाही केली जात आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications