Pakistan News : पाकिस्तानात वादळ अन् पुराचा कहर, इस्लामाबाद उद्ध्वस्त, इशारा जारी!
Pakistan News : पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद त्याचबरोबर खैबर पख्तूनख्वा या भागामध्ये बुधवारी अचानक वादळी वारे अन् गारपिटीचा पाऊस पडला. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे 35 मिनिटांचा वादळ आणि गारपीटीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काही मिनिटांमध्ये होत्याचे नव्हते झाले, असे जे आपण म्हणतो तसाच काहीसा प्रकार इस्लामाबाद शहरात पाहायला मिळाला आहे. गारपिटीमुळे कारच्या काटा फुटल्या, सौर पॅनेल नष्ट झाले, झाडे उन्मळून पडली आणि अनेक भागांमध्ये पावसामुळे नुकसान देखील झाले.
हा सामान्य पाऊस नव्हता, तर निसर्गाचा थेट कोप होता, जो हवामान बदलाचा इशारा देत आहे. एकीकडे काही माध्यमांच्या अहवालानुसार टेनिस बॉलच्या आकाराच्या गारपिटीसह पाऊस झाल्याने या भागातील लोकांचे चांगलेच नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी गारपिटीमुळे वाहनांच्या आणि घरांच्या खिडक्या फुटल्या, सौर पॅनलच्या काचा फुटल्या आणि शेकडो झाडी उन्मळून पडली. अचानक झालेल्या पावसामुळे सखल भागात पूर आला, रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली.
तरनोल या भागामध्ये सर्वाधिक नुकसान देखील झाले. जिथे झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला, पण अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडीत झाला.
اسلام آباد میں قیامت صغری کے مناظر، شدید اور موٹی ژالہ باری سے ہر طرف تباہی کے مناظر #insane #hailstorm #thunderstorm #islamabad #Pakistan #weather pic.twitter.com/IpoASQFNaz
— عاتکہ جمیعتی🥀🇵🇰 (@dewani_jui) April 16, 2025
दुसरीकडे प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नुकसान किती झाले याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी वाहतूक देखील खोळंबल्याने ती सुरळीत करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे.
गारपिटीमुळे वाहनांचे नुकसान!
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात गारपिटीमुळे शेकडो वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस थांबल्यानंतर, लोक त्यांच्या घरांकडे आणि वाहनांची स्थिती पाहून काळजीत पडले.
खैबर पख्तूनख्वामध्येही पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आम्ही लंडीकोटल, मरदान आणि इतर जिल्ह्यांमधील पुराचा सामना करण्यास तयार आहोत. पिकांच्या नुकसानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications