Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताचा नंबर एकचा शत्रू जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अझहरच्या नातेवाईकाची गोळ्या झाडून हत्या

Pakistan News Ejaz Abid shot dead : भारताचा नंबर एकचा शत्रू जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अझहरच्या नातेवाईकाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पाकिस्तानात घडली असून पेशावरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एजाज आबीदला लक्ष्य बनवले.

प्राप्त माहितीनुसार, मारला गेलेला एजाज आबीद हा आपल्या संघटनेमध्ये जैश ए मोहम्मद संघटनेच्या माध्यमातून दहशतवाद्यांची भरती करत होता.

Pakistan News

एजाज आबिद पेशावरमध्ये अज्ञात हल्लेखोरांचे लक्ष्य बनला. या हल्ल्यात त्याचा साथीदार कारी शाहिद हाही गंभीर जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरमधील पिस्ताखारा भागातील मशिदीतून बाहेर येत असताना कारी एजाज आबिद यांच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जवळचा सहकारीही गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात न्यूज 18 ने वृत्त दिले आहे.

एजाज होता आधी या संघटनेचा सदस्य

एका रिपोर्टनुसार, माहितीनुसार, एजाज आबिद हा अहले सुन्नत वाल जमात नावाच्या संघटनेचा महत्त्वाचा सदस्य होता. खत-ए-नबुवत सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा तो प्रांत पातळीवरील नेता होता.

दहशतवादी मसूद अजहर आणि एजाज याचे संबंध काय?

भारताचा नंबर एकचा शत्रू दहशतवादी मसूद अजहर हा एजाज आबिद याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते.

एजाज आबीद मौलाना मसूद अजहर यांच्याशी संबंधित होता आणि देवबंदी विचारसरणीशीही संबंधित होता. मसूद अजहर आणि एजाज आबीद यांनी अनेकदा एकत्र व्यासपीठ गाजवले आहे. विशेषतः ते सुरुवातीच्या काळापासून एकत्र असून त्यांनी एकत्र अभ्यासही केला.

एजाज भरती करण्यात पटाईत

प्राप्त माहितीनुसार, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेत एजाज तरुणांची भरती करायचा. यामध्ये त्याचा चांगलाच हातखंडा होता. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी बनण्यासाठी आमिष दाखवून एजाज भरतीसाठी तरुणांना उद्युक्त करायचा.

एजाज करायचा ब्रेनवाॅश करायचा

नवीन दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि ते संघटनेसाठी कितपत फायदेशीर आहेत हे कळू शकेल यासाठी मसूद अजहर आपल्या संघटनेत थेट भरती टाळत होता तर इतर संघटनेच्या माध्यमातून ही भरती करत होता. एजाज प्रथम तरुणांना आपल्या संघटनेच्या बैठकींना बोलावायचा मगत्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना धोकादायक दहशतवादी बनवायचा नंतर शस्त्रास्त्र, स्फोटके आणि इतर हिंसक कृत्यासंदर्भात प्रशिक्षण द्यायचा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+