पाकिस्तानला लाज उरली नाही, लंडनमध्ये असे कृत्य केले की भारतीयांचा संताप अनावर; VIDEO पाहून उद्रेक!
pakistan high commission staff shamefull act in london : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातील आणि जगभरातील भारतीय लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय विद्यार्थी आणि समुदायातील सदस्य शांततेत निदर्शने करत होते. हे शांततापूर्ण निदर्शन पाहून पाकिस्तान अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाला आहे.

दरम्यान, पाकिस्तान उच्चायुक्तालयातून बाहेर पडताना, पाकिस्तानच्या संरक्षण अटॅची यांनी अभिनंदनचा फोटो दाखवला आणि त्यांचा गळा कापण्याचा इशारा केला. हा सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीयांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही, पाकिस्तानला काही लाजच उरली नाही, यांचा बिमोड झालाच पाहिजे, असेही लोक आता व्हिडिओला प्रतिक्रिया देत आहेत.
These m0therfukers are Pakistani diplomats at the Pakistani Embassy in London! They are doing gestures of cutting throats!!! These people aren’t human they’re Satanic! When they wonder why the world causes them terrorist state! pic.twitter.com/No3eUq1oZ5
— JIX5A (@JIX5A) April 25, 2025
प्रत्यक्षात, लंडनमधील भारतीय समुदायाचे लोक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करत होते. निदर्शकांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आणि 28 जणांच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला.
भारतीय तिरंगा झेंडा, बॅनर आणि फलक हातात घेऊन, भारतीय समुदायाच्या सदस्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.
गळा कापण्याचा इशारा
खरं तर, पहलगाम हल्ल्याचा शांततेत निषेध करण्यासाठी भारतीय विद्यार्थी आणि समुदायातील सदस्य लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर जमले होते. निषेध पाहून पाकिस्तान संतप्त झाला आणि उच्चायुक्तालयातून बाहेर पडताना पाकिस्तानच्या संरक्षण अटॅचेने अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो दाखवला आणि त्यांचा गळा कापण्याचा इशारा केला.
Hindus and Iranians outside the Pakistani embassy in London! #PahalgamTerroristAttack | #Pahalgam pic.twitter.com/Jntf8ZkDb0
— Annamalai Overseas Supporters (AOS) (@Tamils_UK) April 26, 2025
पाकिस्तानविरोधात दिल्या घोषणा
निदर्शकांनी 'भारत माता की जय' आणि 'पाकिस्तान मुर्दावाद' अशा घोषणा दिल्या आणि 'मी हिंदू आहे' असे लिहिलेले पोस्टर हातात घेतले. निदर्शकांनी पाकिस्तानवर भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लपवून ठेवल्याचा आणि मदत केल्याचा आरोप केला.
'पहलगाम हल्ला हा हमासच्या हल्ल्यासारखाच'
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेले भारतीय आंदोलकांतील एका निदर्शकाने सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन दिले आहे, म्हणूनच पहलगाममध्ये आपले 26 पर्यटक अन् दोन स्थानिक लोक मारले गेले. आम्ही या विरोधात निषेध करण्यासाठी येथे जमलो आहोत.
दुसऱ्या एका निदर्शकाने सांगितले की, ब्रिटनमध्ये राहणारा संपूर्ण भारतीय समुदाय या भयानक हल्ल्यामुळे दुःखी आहे. देशात शांतता नांदावी, अशी आमचीी इच्छा आहे. कोणत्याही परिस्थिती असे होता कामा नये, असेही तो म्हणाला.
एका भारतीय-ज्यू निदर्शकाने सांगितले की, भारत आणि इस्रायल दोघांनाही कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचा धोका असल्याने ज्यू समुदाय भारतासोबत उभा आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना इस्रायलमधील हमास हल्ल्याशी केली.












Click it and Unblock the Notifications