Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pakistan Earthquake : आधी भारताकडून दणका अन् दुसरीकडे पाकिस्तानला भूकंपाचा जोरदार धक्का!

Pakistan Earthquake : भारत पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशामध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. सीजफायरचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही देशातील स्थिती काही अंशी बदलण्यास सुरूवात झाली. परंतु, दुसरीकडे पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधीच भारतीय सैन्याने पाकिस्तानला पाणी पाजलेले असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे काही भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बसले जोरदार धक्के!

सोमवार दि.12 मे रोजी दुपारी पाकिस्तानमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या आकडेवारीनुसार, सोमवार 12 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजून 26 मिनिटांनी पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचे केंद्रबिंदू अक्षांश 29.12° उत्तर आणि रेखांश 67.26°पूर्व येथे होते. 10 मे रोजी पाकिस्तानमध्ये त्याच ठिकाणी झालेल्या भूकंपाच्या दोन दिवसांनी हा भूकंप झाला.

Pakistan Earthquake

पाकिस्तानातील काही भाग भूकंपाचे झोन!

पाकिस्तान हा जगातील सर्वात भूकंपीय सक्रिय देशांपैकी एक मानला जातो. ते अनेक प्रमुख पृथ्वी प्लेट्सचे वेढलेले आहे. म्हणूनच पाकिस्तानमध्ये भूकंप वारंवार होतात आणि ते विनाशकारी असतात. पाकिस्तान भौगोलिकदृष्ट्या युरेशियन आणि भारतीय दोन्ही टेक्टोनिक प्लेट्सना व्यापतो.

तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले!

मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात पाकिस्तानला अनेक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 5 मे रोजी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्यात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास भूकंप झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी होती.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात 36.60 अंश उत्तर अक्षांश आणि 72.89 अंश पूर्व रेखांशावर होते. भूकंपाची खोली 10 किलोमीटरमध्ये आता नोंदविली गेली आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घरातून आणि कार्यालयातून थेट बाहेर पळाले.

2005 मध्ये झाला होता विनाशकारी भूकंप!

  • काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे खूप विनाश झाला होता. साधारणत: 8 ऑक्टोबर 2005 रोजी सकाळी 8.50 वाजता, रिश्टर स्केलवर 7.6 तीव्रतेचा भूकंप झाला.
  • ज्याचा केंद्रबिंदू पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबाद होता. नियंत्रण रेषेच्या (LOC) दोन्ही बाजूंनी 80,000 हून अधिक लोक मारले गेले.
  • अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, भारत आणि शिनजियांग प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसण्याची ही दशकातील पाचवी सर्वात धोकादायक नैसर्गिक आपत्ती होती.
  • पाकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपात अधिकृत मृतांची संख्या 73 हजाराच्या जवळपास होती.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+