ऐकावं ते नवलंच..! पाकिस्तानच्या संसदेत मांजरांची भरती, 12 लाखांचं बजेट
सध्या पाकिस्तानात आर्थिक मंदी आहे. राजकीय अस्थिरताही आहे. मात्र येथील खासदार मंदी किंवा अस्थिरतेने नाही, तर उंदरांच्या दहशतीने त्रस्त आहेत. होय... तुम्ही ऐकताय ते खरं आहे. पाकिस्तानी संसदेची सध्याची स्थिती अशी आहे की, संसदेतील अनेक महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रे येथील उंदरांनी फस्त केली आहेत.
अगदी संसदेचं कामकाजही या उंदरांनी प्रभावीत केलं आहे. अधिकाऱ्यांना आणि सदस्यांना खुर्चीवर बसणंही मुश्किल झालं आहे. आता या समस्येवर तोडगा म्हणून पाकिस्तानी संसदेनं अजब डोकं लावलंय. या संकटावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानी संसदेनं थेट 12 लाखांचं बजेटच सादर केलंय. या पैशातून ट्रेन्ड मांजरांची खरेदी करुन त्यांच्याकडून उंदरांची शिकार करण्याचा फंडा वापरण्यात येणार आहे.
शेजारच्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप खराब आहे. लोकांकडे खायला पैसे नाहीयत. सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबलं आहे. आता पाकिस्तान सरकारसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांनी दहशत निर्माण केलीय. पाकिस्तानी संसद उंदरांमुळे त्रस्त आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने एक पाऊल उचललय. पाकिस्तानी संसद उंदरांना संपवण्यासाठी मांजरांची नियुक्ती करणार आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेने या योजनेसाठी बजेटमध्ये 12 लाख रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेनुसार विशेष प्रशिक्षित मांजरांना संसद परिसरात ठेवण्यात येईल. उंदीर पकडून त्यांना मारणं हेच त्यांचं एकमेव काम असेल. पाकिस्तानच्या संसदेत उंदरांची संख्या इतकी वाढली आहे की, त्यामुळे कामकाज प्रभावित होतय. उंदरांमुळे पाकिस्तानी संसदेत काही महत्त्वाच्या कागदपत्रांच नुकसान झालय.
पाकिस्तानी वाहिनी जिओ टीव्हीने सोमवारी ही माहिती दिली. वास्तविक संसदेतील उंदरांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांनी सिनेट आणि नॅशनल असेंब्लीच्या विभागांमधील अनेक महत्त्वाच्या आणि गोपनीय फायली कुरतडल्या आणि नष्ट केल्या. तारा कापून ते संगणकाचे नुकसान करत आहेत. या उंदरांचा नायनाट करण्यासाठी खासगी तज्ज्ञांची मदत घेण्याचाही सीडीएचा विचार आहे. याशिवाय उंदीर पकडण्यासाठी विशेष प्रकारचे जाळीचे सापळे ही बसविण्यात येणार आहेत. या सर्वांसाठी पाकिस्तानी संसदेने तब्बल 12 लाखांची स्वतंत्र तरतूद केली आहे.
मांजराच्या तैनातीमुळे फक्त उंदरांच्या समस्येपासूनच सुटका होणार नाही, तर ही एक नैसर्गिक आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धत आहे. मांजरांना उंदरांना पकडून संपवण्याच ट्रेनिंग दिली जाईल. त्यांना संसद परिसरात ठेवलं जाईल. ही योजना अनेकांना गमतीशीर वाटत आहे. पण एका गंभीर समस्येवर हा उपाय आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांची समस्या याआधी सुद्धा होती. पण आता हा प्रॉब्लेम इतका वाढलाय की, त्यावर तात्काळ तोडगा आवश्यक आहे. मांजर तैनातीची योजना लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या मते ही एक प्रभावी उपायोजना आहे.
गाढव पालनाच्या बाबतीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक लागतो. 2022 मध्ये पाकिस्तानात गाढवांची लोकसंख्या 58 लाख होती. पाकिस्तान दरवर्षी चीनला सरासरी 5 लाख गाढवांची निर्यात करतो, तरीही देशातील गाढवांची संख्या 1 लाखांनी वाढली आहे. पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी म्हटले होते की, आता गाढवांच्या विक्रीतून परकीय गंगाजळी मिळेल. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने चीनला गाढवाच्या कातडीसह गुरे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीलाही मंजुरी दिली होती.
पाकिस्तानमध्ये 80 लाख लोक पशुपालनाचे काम करतात. चीनमध्ये गाढवांच्या निर्यातीतून लोकांच्या कमाईत 40% वाढ झाली आहे. मात्र तरीही पाकिस्तानातील आर्थिक संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशाने आतापर्यंत IMF कडून 6.28 अब्ज कर्ज घेतले आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या सातत्याने वाढत आहे. पाकिस्तान सरकारने दोन महिन्यांपूर्वी देशाचा आर्थिक सर्वेक्षण सादर केला होता, ज्यामध्ये एका वर्षात देशातील गाढवांची संख्या 1.72 टक्क्यांनी वाढून 59 लाखांवर पोहोचल्याचे सांगण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications